AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7th pay commission: निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA आणि ग्रॅच्युटी वाढणार

या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना रोख पेमेंट आणि ग्रॅच्युइटीचे फायदेही जाहीर करण्यात आले आहेत. सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देखील जारी केली आहे. सरकारने एक निवेदन जारी केले आहे ज्यात जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत डीए देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

7th pay commission: निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA आणि ग्रॅच्युटी वाढणार
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 12, 2021 | 9:18 AM
Share

नवी दिल्ली: सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता त्यांना एकाच वेळी ग्रॅच्युइटी, रोख पेमेंट आणि वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळेल. केंद्र सरकारने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने ही माहिती दिली आहे. या विभागाने म्हटले आहे की, आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही रोख पैसे आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळेल.

केंद्र सरकारच्या कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी अशीच एक घोषणा नुकतीच करण्यात आली. या कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सरकारने DA आणि DR मध्ये वाढ जाहीर केली आहे. कोरोनामुळे सरकारने DA मध्ये केलेली वाढ थांबवली होती, जी आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना रोख पेमेंट आणि ग्रॅच्युइटीचे फायदेही जाहीर करण्यात आले आहेत. सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देखील जारी केली आहे. सरकारने एक निवेदन जारी केले आहे ज्यात जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत डीए देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार?

कार्यरत कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ मिळू लागला आहे. या कर्मचाऱ्यांचा डीए पुन्हा वाढू शकतो. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आधीच 28%वाढ करण्यात आली आहे. जून 2021 साठी महागाई भत्ता जाहीर केला जाणार आहे. परंतु, गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे महागाई भत्त्याचे तीन अर्धवार्षिक हप्ते जुलै २०२१ पर्यंत स्थगित ठेवण्यात आले होते. 14 जुलै रोजीच डीए 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के इतका करण्यात आला होता. त्यामुळे जूनमधील वाढीबाबत अद्याप निर्णय घेणे बाकी आहे.

कोणत्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा?

जानेवारी 2020 ते जून 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच रोख पेमेंट आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळेल. याबाबतच्या एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, निवृत्त कर्मचाऱ्यांना रजा एन्कॅशमेंट आणि ग्रॅच्युइटीचा लाभ दिला जाऊ शकतो. कार्यरत कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए 17% वरून 28% करण्यात आला आहे. हा निर्णय 1 जुलैपासून लागू झाला आहे.

ग्रॅच्युटी कशी मोजली जाणार?

ग्रॅच्युइटीची गणना कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेनुसार किंवा कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या तारखेनुसार केली जाते. ग्रॅच्युइटी आणि लीव्ह एन्कॅशमेंटची गणना करण्यासाठी डीएची राष्ट्रीय टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. जर एक कर्मचारी 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2020 दरम्यान सेवानिवृत्त झाला असेल तर त्याला 21 टक्के डीए मिळेल. 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत सेवानिवृत्त झालेले कर्मचारी 24% DA च्या स्लॅबखाली येतील. 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 28% DA नियम लागू होऊ शकतो.

संबंधित बातम्या

SBIमध्ये खाते उघडल्यास लहानग्यांनाही मिळणार एटीएम कार्ड; दररोज 5000 रुपये काढण्याची सुविधा

गृह कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना मिळतेय 10 हजारांचं गिफ्ट वाऊचर, 22 जुलैपर्यंत शेवटची संधी

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…