नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला. केंद्रीय कर्मचाऱ्याला शेवटच्या पगाराच्या मूळ वेतनातील 80% दराने समग्र स्थानांतरण अनुदान (Composite Transfer Grant (CTG)) देण्याचा नियम आहे. कर्तव्यस्थानापासून 20 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्थात नोकरीच्या ठिकाणी अथवा त्यापासून 20 किलोमीटरच्या आत राहणाऱ्या कर्मचा-यांना हे मूळ वेतनातील 80 टक्के दराने समग्र स्थानांतरण अनुदान देण्यात येत होते. केंद्र सरकारमध्ये विविध राज्यातील कर्मचारी काम करतात. सेवानिवृत्तीनंतर त्यांना या नियमाच्या अडथळ्यामुळे या विशेष भत्त्यावर पाणी सोडावे लागत होते. कारण सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक कर्मचारी त्यांच्या राज्यात स्थायिक होण्याला पसंती देत होते.