Diwali Offer : खरेदीवर एक कोंबडं आणि दारुची बाटली एकदम फ्री..दिवाळीला या शहरातील दुकानदाराची भन्नाट ऑफर

Diwali Offer : उत्पादनाची, मालाची, सामानाची लवकर विक्री होण्यासाठी या दुकानदारानं भन्नाट ऑफर दिली आहे..

Diwali Offer : खरेदीवर एक कोंबडं आणि दारुची बाटली एकदम फ्री..दिवाळीला या शहरातील दुकानदाराची भन्नाट ऑफर
Diwali offerImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 4:01 PM

अमृतसर :  उत्पादन (Product) हातोहात विक्री व्हावे यासाठी दुकानदार (seller) काय काय शक्कल लढवतात. एकावर एक फ्री, सवलतीत वस्तू , हप्त्यावर वस्तू न्या, अशा अनेक ऑफर (Offer) देण्यात येतात. पण पंजाबमधील (Punjab) या पठ्याने मालाची विक्री होण्यासाठी ग्राहकांना जीवंत कोंबडं (Chicken)आणि त्याच्यासोबत एक दारुची बाटली (Liquor Bottle) मोफत देण्याची भन्नाट ऑफर सुरु केली. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. आता तुम्हाला उत्सुकता असेल तो कोणत्या वस्तूची विक्री करत होता याची? नाही का?..

पंजाबमधील अमृतसर येथील मोबाईल दुकानदाराने ही भन्नाट ऑफर सुरु केली आहे. दिवाळीत मोबाईलची जोरात विक्री होण्यासाठी त्याने ही अनोखी ऑफर सुरु केली आहे.

मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकाला एक जीवंत कोंबडं आणि दारुची बाटली मोफत देण्याची ही ऑफर प्रचंड व्हायरल झाली. ग्राहकांनी या दुकानाकडे धाव घेतली. विशेष म्हणजे या ग्राहकांमध्ये पोलीस ही होते.

हे सुद्धा वाचा

मोबाईल, जीवंत कोेबडं आणि दारुची बाटली सोबत घेऊन लोकांनी सेल्फी आणि फोटोही काढले. त्यामुळे या मोबाईल दुकानाची आयती जाहिरात झाली आणि लोकांची एकच झुबंड उडाली.

अमृतसरमधील हुसैनपुरा भागात ही मोबाईलची शॉपी आहे. या भागात मोबाईल दुकानदारांनी दिवाळीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा भन्नाट आयडिया लढवल्या आहेत. त्याआधारे ग्राहकांना दुकानात खरेदीसाठी आकर्षित करण्यात येत आहे.

या ऑफरची माहिती पडताच एक पोलिस कर्मचारी ही त्याच्या मित्रासह पोलिस गणवेशातच दुकानावर पोहचला. पोलिसाने या दुकानातून मोबाईल खरेदी केला. त्याला दुकानदाराने कबुल केल्याप्रमाणे एक कोबडं आणि दारुची बाटली मोफत दिली.

दरम्यान ज्या ग्राहकांनी ही ऑफर स्वीकारली. त्यांनी दुकानदार आणि इतर ग्राहकांसोबत फोटो काढले. त्यामुळे या दुकानाची आयती जाहिरात झाली. त्यामुळे दुकानावर आणखी गर्दी वाढली.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.