AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागाईचा आणखी एक झटका; उबेरकडून प्रवाशी भाड्यात वाढ, ‘या’ शहरांमध्ये वाढवले दर

उबेरकडून आपल्या ग्राहकांना आणखी एक झटका देण्यात आला आहे. कंपनीच्या वतीने भाड्यात वाढ करण्यात आल्याने प्रवास महागणार आहे.

महागाईचा आणखी एक झटका; उबेरकडून प्रवाशी भाड्यात वाढ, 'या' शहरांमध्ये वाढवले दर
| Updated on: May 20, 2022 | 2:28 PM
Share

महागाई (Inflation) गगनाला भिडली आहे. पेट्रोल, डिझेलच्या भावापासून ते सीएनजी, एलपीजीपर्यंत आणि खाद्यतेलापासून ते अन्नधान्यापर्यंत सर्वच वस्तुंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. तो म्हणजे प्रवासी वाहतूक करणाऱ्या उबेर कंपनीने (Uber India) आपल्या भाड्यामध्ये वाढ केली आहे. म्हणजे आता शहरात फिरणे देखील महाग होणार आहे. याबाबत कंपनीच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. आम्ही गेल्या काही आठवड्यांमध्ये देशातील अनेक शहरांमधील प्रवासी भाड्यात वाढ केल्याचे कंपनीने म्हटले आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे (Fuel Prices) आमचे जे पार्टनर ड्रायव्हर आहेत त्यांना तोटा होत आहे. मार्जीनमध्ये मोठी घट झाली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही भाड्यात वाढ केल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या दीड महिन्यामध्ये सीएनजीच्या दरात चारदा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीमध्ये होत असलेल्या दरवाढीचा देखील मोठा फटका हा सध्या चालकांना बसत आहे.

राईड स्विकारण्याचे चालकाला स्वातंत्र्य

एकीकडे कंपनीने आपल्या भाड्यात वाढ करून चालकांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र दुसरीकडे उबेरने आपल्या पार्टनर ड्रायव्हरसाठी आणखी एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामध्ये तुम्ही जेव्हा उबेरची कॅब बूक करता तेव्हा आता चालकाला तुम्हाला कुठे जायचे आहे त्याचे लोकेशन आधीच दिसणार आहे. त्यावरून तो ती राईड स्विकारायची की नाही याबाबत निर्णय घेऊ शकतो. सध्या पेट्रोल, डिझेलसह इतर इंधनाचे दर मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. यातून चालकांना दिलासा मिळावा यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सध्या ही सुविधा देशातील प्रमुख 20 शहरांमध्ये आहे लवकरच ही सुविधा इतर ठिकाणी देखील लागू करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

देशाच्या प्रमुख शहरातील सीएनजीचे दर

राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत प्रति किलो 73.61 रुपये आहे. नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 76.17 इतका आहे. मुजफ्फरपूर, मेरठ,शामलीमध्ये सीएनजीचा दर प्रति किलो 80.84 रुपये आहे. गुरुग्राममध्ये सीएनजीचा भाव 81.94 रुपये असून, कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये सीएनजी प्रति किलो 85.40 रुपये आहे. तर दुसरीकडे राज्यात मुंबई आणि पुण्यात सीएनजीची किंमत प्रति किलो 76 रुपये इतकी आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

एकीकडे सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी सारख्या इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे कच्च्या तेल्याच्या दरात तेजी असताना देखील देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात सहा एप्रिल रोजी शेवटची भाव वाढ करण्यात आली होती. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटरमागे तब्बल दहा रुपयांपेक्षाही अधिक महाग झाले मात्र सहा एप्रिलपासून दर स्थिर असल्याचे पहायला मिळत आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.