दहा हजारांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर कोणती बँक देतेय सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सर्वकाही

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही अवघ्या सात दिवसांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक करु शकता. गेल्या काही काळात अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्यामुळे बँकांनी मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी केला आहे. त्यामुळे ग्राहक सातत्याने फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याज मिळवून देणाऱ्या योजनांच्या शोधात असतात.

दहा हजारांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर कोणती बँक देतेय सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सर्वकाही
फिक्स्ड डिपॉझिट


मुंबई: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये बँकेतील मुदत ठेव योजनांचा (Fixed Deposit Scheme) पर्याय नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. तुलनेत कमी जोखमीची आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिले जाते. त्यामुळे आजही गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असूनही सामान्य गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही अवघ्या सात दिवसांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक करु शकता. गेल्या काही काळात अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्यामुळे बँकांनी मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी केला आहे. त्यामुळे ग्राहक सातत्याने फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याज मिळवून देणाऱ्या योजनांच्या शोधात असतात.

प्रत्येक बँक FD चे व्याजदर स्वतःच्या मते ठरवते. यामध्ये गुंतवणूकीची रक्कम आणि FD ची मुदत पाहिली जाते. हे स्पष्ट आहे की ज्या दिवसांसाठी FD केले जाते, त्यानुसार परतावा प्राप्त होईल. बर्‍याच बँका काही दिवसांपासून 5 वर्षांच्या कालावधीसह एफडी देतात. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार एफडी योजना घेऊ शकतात. एफडी तोडणे कठीण असल्याने आणि दंडाची तरतूद असल्याने ग्राहकाने सर्व गोष्टी लक्षात ठेवून यामध्ये गुंतवणूक करावी.

एक वर्षाची मुदत ठेव

इंडसइंड बँक आणि आरबीएल बँक एका वर्षाच्या एफडीवर 6 टक्के व्याज देत आहेत. या दोन बँकांमध्ये 10 हजार रुपयांच्या ठेवींवर 10,614 रुपये मिळत आहेत. DCB बँकेचा व्याजदर 5.55 टक्के आहे आणि 10 हजारांच्या मुदत ठेवीवर वर्षभरात 10,567 रुपये मिळत आहेत. बंधन बँक 5.50 टक्के व्याज देत आहे आणि या FD मध्ये वर्षभरानंतर 10 हजार 561 रुपये मिळत आहेत. कर्नाटक बँक आहे जी 5.20 टक्के व्याज देत आहे आणि येथे वर्षभराच्या मुदत ठेवीवर 10,530 रुपये मिळतील.

दोन वर्षाची मुदत ठेव

इंडसइंड बँक आणि आरबीएल बँक 6 टक्के व्याज देत आहेत. या दोन बँकांमध्ये 10 हजार रुपयांच्या एफडीवर 2 वर्षात 11,265 रुपये मिळत आहेत. बंधन बँक आणि डीसीबी बँकेचा व्याजदर 5.50 टक्के आहे आणि येथे 10 हजारांच्या गुंतवणुकीवर 11,154 रुपये परतावा दिला जात आहे. अॅक्सिस बँक 2 वर्षांच्या FD वर 5.40 टक्के व्याज देत आहे आणि 10,132 रुपये मिळत आहेत.

तीन वर्षाची मुदत ठेव

तीन वर्षांच्या FD मध्ये RBL बँकेचे नाव सर्वात वर आहे. येथे 10 हजारांच्या गुंतवणुकीवर 6.30 टक्के व्याजासह 12,062 रुपये मिळत आहेत. इंडसइंड बँक 3 वर्षांच्या एफडीवर 6 टक्के व्याजासह 10 हजार रुपये 11,956 परतावा देत आहे. DCB बँक 5.95 टक्के व्याजासह 10 हजार रुपयांवर 11,939 रुपये परतावा देत आहे. कर्नाटक बँक आणि साउथ इंडियन बँक १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर ११.781 रुपये परतावा देत आहे.

पाच वर्षाची मुदत ठेव

RBL बँक पाच वर्षांच्या कालावधीसाठी 6.30 टक्के व्याजासह 10 हजारांच्या गुंतवणुकीवर 13,669 रुपये परतावा देत आहे. इंडसइंड बँक 6 टक्के व्याजासह 10 हजारांच्या गुंतवणुकीवर 13,469 रुपये परतावा देत आहे. DCB बँक 5.95 टक्के व्याजासह 10 हजाराच 13,435 रुपये परतावा देत आहे. अॅक्सिस बँक 5.75 टक्के व्याजदरासह 10 हजारांपैकी 13,304 रुपये देत आहे. साऊथ इंडियन बँक पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.65 टक्के व्याजासह 13,238 रुपये परतावा देत आहे.

संंबंधित बातम्या:

आता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार; एका वर्षासाठी किती व्याज मिळणार?

सप्टेंबर महिन्यात ‘या’ 5 बँकांच्या FD मधल्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा, जाणून घ्या सर्वकाही

या तीन बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI