Bank Holidays: नोकरदारांसाठी खुशखबर, जुलै महिन्यात सुट्ट्यांची चंगळ

Bank Holidays | पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी फिरायला जाण्याचे प्लॅन्स आखायला सुरुवात केली आहे. हे प्लॅन्स प्रत्यक्षात येण्यासाठी जुलै महिना उत्तम कालावधी आहे.

Bank Holidays: नोकरदारांसाठी खुशखबर, जुलै महिन्यात सुट्ट्यांची चंगळ
Bank holiday list
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 12:13 PM

मुंबई: गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे बहुतांश सर्वचजण घरातून काम करत आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी फिरायला जाण्याचे प्लॅन्स आखायला सुरुवात केली आहे. हे प्लॅन्स प्रत्यक्षात येण्यासाठी जुलै महिना उत्तम कालावधी आहे. कारण या महिन्यात नोकरदारांना भरपूर सुट्ट्या (Bank Holiday) मिळणार आहेत. (Read List of Bank Holidays of 15 days in July 2021 month)

अगदी आज 7 जूनपासून हिशेब करायचा झाला तरी या महिन्यात थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 14 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. यापैकी 7 सुट्ट्या या सणावाराच्या किंवा धार्मिक दिवसांसाठी आहेत. प्रत्येक राज्यातील कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या मिळतीलच असे नाही. याशिवाय, जुलै महिन्यात विक ऑफ आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमानुसार, आठवडी सुट्टी आणि विविध सणांच्या सुट्टी असे सर्व दिवस मिळून जुलै 2021 महिन्यात केवळ 15 दिवसच बँका सुरू राहतील. बँक कर्मचाऱ्यांना तब्बल 15 दिवस सुट्टी मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना आपली बँकेतील कामं या 15 दिवसातच करावी लागणार आहे.

जुलै महिन्यात कोणत्या दिवशी बँकांना सुट्टी

जुलै महिन्यात रथयात्रा, भानु जयंती, बकरी ईद आणि केर पुजेसारख्या अनेक सुट्टी आहेत. जुलै महिन्यातील पहिलीच सुट्टी 4 जुलै रोजी आहे. या दिवशी रविवार आहे. यानंतर 10 आणि 11 जुलै रोजी शनिवार आणि रविवारमुळे बँका बंद असतील. 12 जुलै रोजी रथ यात्रा उत्सव असणार आहे. ओडिशातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळख असलेल्या या रथयात्राच्या दिवशी तेथील सर्व बँका बंद असतात. दुसरीकडे 13 जुलै रोजी भानु जयंतीमुळे सिक्किममधील बँका बंद राहतील.

14 जुलै रोजी दुरुकपा तेस्ची सणामुळे सिक्किममधील बँकांना सुट्टी असेल. 16 जुलैला रहेलामुळे उत्तराखंडमधील बँका बंद असतील. 17 जुलैला खर्ची पुजेमुळे त्रिपुरा आणि मणिपूरमधील बँकांना सुट्टी असेल. 18 जुलै रोजी रविवार असल्यानं देशभरातील बँका बंद राहतील. 19 जुलै रोजी गुरु रिम्पोचे थुंगाकरमुळे (Guru Rimpoche Thungakar) सिक्किममधील बँकांना सुट्टी असेल.

20-21 जुलैला बकरी ईदमुळे बँका बंद

20 जुलै रोजी बकरी ईदची सुट्टी असेल. या दिवशी जम्मू-काश्मीर आणि केरळमध्ये सुट्टी असते. दुसरीकडे देशातील इतर बहुतांश भागात बकरी ईदची सुट्टी 21 जुलै रोजी असते. त्यामुळे या दिवशी त्रिपुरा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडु, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, नवी दिल्ली, गोवा आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. यानंतर 24 आणि 25 जुलै रोजी आठवडी सुट्टी असल्यानं बँका बंद असतील. 31 जुलै रोजी त्रिपुरामध्ये केरा पूजेमुळे बँका बंद असतील. अशाप्रकारे कोणत्या न कोणत्या प्रकारे देशभरातील बँका तब्बल 15 दिवस बंद असणार आहेत.

(Read List of Bank Holidays of 15 days in July 2021 month)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.