EPFO | तुमच्या PF खात्यात सरकार किती पैसे टाकणार?, जरा समजून घ्या हिशेब

EPFO Alert | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) तुमच्या खात्यात लवकरच पीएफ व्याजाची रक्कम जमा होईल. केंद्र सरकारने EPF वर 8.1 टक्के व्याज दर निश्चित केला आहे. आता तुमच्या खात्यात व्याजाची किती रक्कम येईल, हे तुमच्या जमा राशीवर अवलंबून राहील.

EPFO |  तुमच्या PF खात्यात सरकार किती पैसे टाकणार?, जरा समजून घ्या हिशेब
लवकरच व्याज जमा होणार
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Sep 04, 2022 | 1:17 PM

EPFO Alert | सरकारी नोकरदारांना (Government Employees) लवकरच बाप्पा पावणार आहे. त्यांच्या पीएफ खात्यात लवकरच व्याजाची खेप पोहचेल. केंद्र सरकार लवकरच पीएफ खातेदारांच्या (PF Account Holder) खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. सरकारने यावर्षासाठी पीएफचा व्याजदर (PF Interest Rate) निश्चित केलेला आहे. हा व्याजदर 8.1 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा रक्कमेनुसार त्यांना व्याजाची रक्कम मिळेल. त्यामुळे तुमच्या खात्यातील रक्कम तुम्ही कोरोना काळात खर्च केली नसेल तर व्याजही जास्त मिळेल. परंतु, तुम्ही ही रक्कम काढली असेल तर जमा रक्कमेआधारे तुम्हाला व्याज मिळेल. सरकार लवकरच व्याजाची रक्कम जमा करणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अद्याप व्याजाची रक्कम कधीपर्यंत जमा होईल याची अधिकृत माहिती दिलेली नाही.

या महिन्यात व्याजाची रक्कम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार या महिन्यात पीएफ खातेदारांना खुशखबर देऊ शकते. सणावारांच्या तोंडावर पीएफ खात्यात व्याजाची रक्कम येऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत जमा राशीवर व्याज सरकारने यापूर्वीच निश्चित केले आहे. या आर्थिक वर्षात 2021-22 साठी EPF वर 8.1 टक्के व्याज निश्चित करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार या महिन्यात पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा करू शकते.

किती रक्कम येईल खात्यात?

पीएफ खात्यात किती रक्कम जमा करण्यात येईल, हे कसं ठरवणार? तर सरकार यंदा EPF वर 8.1 टक्के व्याज देणार आहे. तुमच्या खात्यात किती रक्कम आहे, त्यावर व्याजदराने व्याजाची रक्कम जमा होईल. समजा एखाद्याच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा आहेत. तर त्याला या रक्कमेवर 8.1 टक्के व्याज दराने 8,100 रुपये मिळतील.

घरबसल्या तपासा रक्कम

पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.

मिस्ड कॉलद्वारे PF शिल्लक समजणार

तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

हे सुद्धा वाचा

उमंग अॅपद्वारे पैसे तपासा

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग अॅप डाउनलोड करा.
त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून अॅपमध्ये लॉग इन करा.
त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा.
येथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें