AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Business Ideas: सरकार ‘हा’ व्यवसाय सुरु करण्यासाठी देणार प्रोत्साहन, महिन्याला तगडी कमाई

Business | अलीकडच्या काळात कॉयर उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात व्यवसाय सुरू करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.आजघडीला कॉयर उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 7.3 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो.

Business Ideas: सरकार 'हा' व्यवसाय सुरु करण्यासाठी देणार प्रोत्साहन, महिन्याला तगडी कमाई
स्वत:चा व्यवसाय सुरु करा
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 6:39 AM
Share

नवी दिल्ली: स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. मोदी सरकारने नारळाच्या करवंट्यांपासून गृहपयोगी वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. कोकण, उत्तर आणि ईशान्य भारतात या उद्योगाची बाजारपेठ विकसित करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे.

कॉयरच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा 70 टक्के आणि कॉयर उत्पादनांच्या जागतिक व्यापारात 80 टक्के वाटा आहे. अलीकडच्या काळात कॉयर उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात व्यवसाय सुरू करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. आजघडीला कॉयर उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 7.3 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. त्यापैकी 80 टक्के महिला आहेत. गेल्यावर्षी कोरोना संकटातही उद्योगाने निर्यात प्रमाणात 17 टक्के आणि नारळापासून बनवलेल्या कॉयर उत्पादनांच्या 37 टक्के वाढीसह 3,778.97 कोटी रुपयांची पातळी गाठली आहे.

निर्यातीची अमाप संधी

कॉयर उद्योग हा पारंपारिक, श्रम प्रधान, कृषी-आधारित आणि निर्यात-केंद्रित उद्योग आहे. हा उद्योग टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करतो. खादी, गावे आणि कॉयर उद्योगासह देशातील MSME क्षेत्राच्या वाढ आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.

काय आहे सरकारची योजना?

कॉयर सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकारने कॉयर उद्यमी योजना चालवली आहे. याअंतर्गत सुलभ अटींवर कर्जासह अनुदानही दिले जाते. यामध्ये 40 टक्के पर्यंत अनुदान मिळते. तसेच कमी व्याज दराने 55 टक्के पर्यंत कर्ज दिले जाते. क्वॉयरशी संबंधित उत्पादने बनवताना, सरकार तुम्हाला कर्ज, सबसिडी व्यतिरिक्त अनेक सुविधा देते.

अवघ्या 50 हजारांच्या भांडवलाची गरज

कॉयर व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला स्वतःहून 50,000 रुपये गुंतवावे लागतील. क्वॉयर बोर्ड उद्यमी योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना क्रेडिट लिंक्ड सबसिडी दिली जाते. तुमच्या प्रकल्पाच्या मंजुरीवर, बँकेतून 55 टक्के पर्यंत कर्ज उपलब्ध असेल तर तुम्हाला क्वॉयर बोर्डाकडून 40 टक्के अनुदान मिळेल. म्हणजेच, एकूण 10 लाख रुपयांच्या प्रकल्पाच्या खर्चापैकी तुम्हाला कर्जातून 9.50 लाख रुपये मिळतील. तुम्हाला स्वतःला फक्त 50 हजार रुपये गुंतवावे लागतील.

योजनेत सहभागी होण्यासाठी कशाप्रकारे अर्ज कराल?

कोणताही वैयक्तिक, बचत गट, कंपनी, स्वयंसेवी संस्था, सोसायटी, सहकारी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट क्वॉयर उद्योजक योजनेमध्ये अर्ज करू शकतात. आपण ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. यासाठी http://coirservices.gov.in/frm_login.aspx वर लॉग इन करून अधिक माहिती मिळवू शकता.

संबंधित बातम्या:

फक्त तीन दिवस उरले, मोदी सरकार नियम बदलणार?; नोकरदारांना 12 तास काम, 15 मिनिटांचाही ओव्हरटाईम

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

तुमच्या जुन्या एलपीजी सिलेंडरच्या बदल्यात घ्या नवीन फायबर ग्लास कम्पोझिट सिलेंडर, एवढे मोजावे लागतील पैसे

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.