AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉमन सर्व्हिस सेंटरचा व्यवसाय सुरु करा आणि बक्कळ पैसा कमवा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

CSC | या कॉमन सर्व्हिस सेंटर्समुळे सरकारी योजना किंवा इतर कामांसाठी प्रत्येकवेळी सरकारी कार्यालयात धाव घ्यावी लागत नाही. CSC मध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, बँकिंग आणि आर्थिक सेवा इत्यादी कामे होऊ शकतात.

कॉमन सर्व्हिस सेंटरचा व्यवसाय सुरु करा आणि बक्कळ पैसा कमवा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 8:51 AM
Share

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानातंर्गत देशभरात कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) उघडण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये बँकिंग आणि डिजिटल सुविधा पुरवण्याच्यादृष्टीने ही कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु केली जात आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. डिजिटल इंडिया अभियानंतर्गत आतापर्यंत देशभरात 4 लाखांहून अधिक CSC सेंटर उघडली गेली आहेत.

या कॉमन सर्व्हिस सेंटर्समुळे सरकारी योजना किंवा इतर कामांसाठी प्रत्येकवेळी सरकारी कार्यालयात धाव घ्यावी लागत नाही. CSC मध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, बँकिंग आणि आर्थिक सेवा इत्यादी कामे होऊ शकतात. या केंद्रांवर जन्माचा दाखला, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची सुविधा उपलब्ध असते. तुम्ही केवळ दहावी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला संगणकाचे ज्ञान असेल तर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु करु शकता. देशातील सर्व राज्यांमध्ये CSC सेंटर्स PPP मॉडेलवर चालतात.

CSC सुरु करण्यासाठी काय करावे लागेल?

कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु करण्यासाठी www.csc.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. संकेतस्थळाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या CSC VLE या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडावा.

CSC च्या माध्यमातून पैसे कसे कमवाल?

कॉमन सर्व्हिस सेंटरवर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी सरकारकडून 11 रुपये दिले जातात. याशिवाय, ट्रेन, विमान, बस तिकीटांच्या बुकिंगवर 10 ते 20 रुपयांची कमाई होते. तसेच एखादे बिल भरण्यासाठी आणि सरकारी योजनांमध्ये नाव नोंदवण्याचे काम कॉमन सर्व्हिस सेंटरवर होऊ शकते.

SBI ग्राहक सेवा केंद्र सुरु करा आणि बसल्या जागी हजारो रुपये कमवा

भारतीय स्टेट बँकेकडून आपल्या ग्राहकांना प्रत्यक्ष शाखा, ऑनलाईन आणि डिजिटल अ‍ॅप्लिकेशन अशा विविध माध्यमातून सेवा पुरवल्या जातात. आजघडीला एसबीआय (SBI) ही देशात सर्वाधिक शाखा असणाऱ्या बँकांपैकी एक आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी SBIकडून अनेक ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र (Custome Service Point) तयार करण्यात आली आहेत. याठिकाणी तुम्हाला पैसे जमा करणे किंवा खाते उघडणे यासारख्या सेवा दिल्या जातात.

ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी अशाप्रकारची ग्राहक सेवा केंद्रे खूपच फायदेशीर ठरतात. कोणीही ग्राहक सेवा केंद्र सुरु करु शकतो. या माध्यमातून बऱ्यापैकी अर्थार्जनही होते. ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात. SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयात (RBO) अर्ज सादर करावा लागतो.

https://bank.sbi/portal/web/home/branch-locator या पोर्टवरुन तुमच्या परिसरातील RBO चा पत्ता मिळेल. याशिवाय, तुम्ही जवळच्या शाखेतूनही हा पत्ता मिळवू शकता. काही खासगी कंपन्यांच्या माध्यमातूनही SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मदत केली जाते. मात्र, काहीवेळा याठिकाणी फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या माहितीचा स्रोत नीटपणे तपासावा.

संबंधित बातम्या:

Home Loan : गृहकर्ज घ्यायचय, मग ‘या’ गोष्टी नक्की तपासून घ्या

Swiss bank मधील भारतीयांच्या वाढत्या पैशांचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळलं, बँकेकडे पुरावे मागितले

Fathers Day : ‘फादर्स डे’ला वडिलांना आरोग्य विमा भेट द्या, 5 मोठे लाभ मिळवा

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.