5

LPG GAS SUBSIDY: ‘उज्ज्वला’च्या खात्यात पुन्हा अनुदान, 200 रुपये होणार वर्ग; जाणून घ्या- नोंदणी प्रक्रिया

केंद्राच्या एलपीजी अनुदानाच्या सहाय्यतेमुळं ग्राहकांना सिलिंडर 800 रुपयांत उपलब्ध होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडर वरील अनुदान बंद आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयामुळं सर्वसामान्यांच्या खिशावरील भार हलका होणार आहे.

LPG GAS SUBSIDY: ‘उज्ज्वला’च्या खात्यात पुन्हा अनुदान, 200 रुपये होणार वर्ग; जाणून घ्या- नोंदणी प्रक्रिया
गॅसवरील सबसीडी कशी मिळवाल?Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 10:01 PM

नवी दिल्ली– केंद्र सरकारनं पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala scheme) अंतर्गत प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर अनुदानाची घोषणा केली आहे. केंद्राच्या वतीनं प्रत्येक सिलिंडर मागे 200 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कराच्या (EXCISE RATE) कपातीच्या निर्णयासोबत एलपीजीवर अनुदान मिळाल्यानं सर्वसामान्यांना दुहेरी दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 12 सिलिंडर दिले जातात. सध्या एलपीजी सिलिंडरचे (LPG GAS CYLINDER) दर 1000 रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत. केंद्राच्या एलपीजी अनुदानाच्या सहाय्यतेमुळं ग्राहकांना सिलिंडर 800 रुपयांत उपलब्ध होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडर वरील अनुदान बंद आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयामुळं सर्वसामान्यांच्या खिशावरील भार हलका होणार आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

उज्ज्वला पुन्हा ‘चुलीवर’:

आर्थिक उत्पन्न विशिष्ट निकषापेक्षा कमी असलेल्या महिलांना उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मोफत गॅसचं कनेक्शन दिलं जातं. योजनेच्या आरंभीच्या काळात माफक किंमतीत गॅस सिलिंडर उपलब्ध केले जात होते. कोविड प्रकोपाच्या काळात अनुदानाला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला होता. सदर योजनेच्या अंतर्गत केंद्रानं 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरच्या भावानं उच्चांक गाठल्यामुळं सर्वसामान्यांच्या खानपानाचं बजेट कोलमडलं होतं. सिलिंडरच्या वाढत्या दरामुळं महिलांनी पुन्हा चुलीचा मार्ग पत्करला होता.

तुम्ही अनुदान कसे तपासाल?

· सर्वात पहिल्यांदा www.mylpg.in वर जा

हे सुद्धा वाचा

· स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुमच्या कंपनीचा सिलिंडर निवडा

· साईन-इन करण्याद्वारे नवीन यूजर पर्यायावर क्लिक करा

· तुमचा आयडी यापूर्वीच असल्यास साईन-इन करा

· तुमच्याकडे आयडी नसल्यास पुन्हा नव्याने बनवा

· तुमच्या नोंदणीनंतर ‘सिलिंडर बुकिंग पाहा’ वर टॅप करा

· तुमची सिलिंडर संख्या व अनुदान तपशील पाहा

· तुम्हाला सिलिंडर बुकिंग करुनही अनुदान न मिळाल्यास फीडबॅक बटनावर क्लिक करा

उज्ज्वला योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया:

तुम्ही अद्याप उज्ज्वला गॅस योजनेसाठी नोंदणी केली नसल्यास तुम्हाला अर्ज करावा लागेल. उज्ज्वला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म डाउनलोड करा. एलपीजी वितरांकडे अर्ज जमा करा. तुमच्या अर्जावर संपूर्ण पत्त्यासह जनधन खात्याचा तपशील हवा. तुम्ही अर्ज जमा केल्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन त्या आधारावर कनेक्शन दिले जाईल.

Non Stop LIVE Update
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...