Mutual Fund : मोठी अपडेट! म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना जोरदार झटका, आता टॅक्स बेनिफिट विसरा

Mutual Fund : जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर या बातमीने तुम्हाला झटका बसेल. कारण म्युच्युअल फंडातील काही फंडात तुम्ही गुंतवणूक करत असाल तर आता तुम्हाला टॅक्स बेनिफिट विसरावा लागेल.

Mutual Fund : मोठी अपडेट! म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना जोरदार झटका, आता टॅक्स बेनिफिट विसरा
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 11:20 AM

नवी दिल्ली : जर तुम्ही म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करात असाल तर या बातमीने तुम्हाला झटका बसेल. कारण म्युच्युअल फंडातील काही फंडात तुम्ही गुंतवणूक करत असाल तर आता तुम्हाला टॅक्स बेनिफिट विसरावा लागेल. कारण केंद्र सरकार त्यासाठी मोठं पाऊल उचलत आहे. याविषयीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. म्युच्युअल फंडमधील काही फंड्समध्ये गुंतवणूक केल्यास, त्यावर कर सवलत मिळत होती. आता ही सवलत केंद्र सरकार बंद करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी या वर्षाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली होती. म्युच्युअल फंडातील इक्विटी शेअर म्हणजे डेट फंडमध्ये (Debt Fund) 35 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक करता येणार नाही.

टॅक्स बेनिफिट

सध्याच्या काळात डेट फंडमध्ये गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिटचा कर फायदा मिळतो. जर कोणी डेट फंडमध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवल्यास, इंडेक्सेशन बेनिफिटसह 20% लॉन्ग टर्म कॅपिटल गेन कर लावल्या जातो. वास्ताविक, फिक्स्ड डिपॉझिटवर मिळत असलेले व्याज टॅक्स स्लॅबनुसार मिळते. प्रस्तावानुसार, तीन वर्षांपेक्षा जास्त काळपर्यंत डेट फंडाच्या इंडेक्सेशनचा लाभ मिळणार नाही आणि 20% टॅक्स बेनिफिटसाठी पात्र नसाल.

हे सुद्धा वाचा

कर बचतीचा फायदा

जर तुम्ही कर बचत फंड वा ईएलएसएस योजनेत गुंतवणूक करण्याचे निश्चित केले असेल तर त्यासाठी या फंडाला 9 कसोट्या लावणे आवश्यक आहे. विविध म्युच्युअल फंड हाऊसच्या ईएलएसएस योजनेला या कसोट्यावर तपासून पहा. त्याआधारे तुम्हाला कोणत्या कंपनीचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी योग्य आहे, हे ठरविताना मग गोंधळ उडणार नाही. तुम्हाला कर बचतीचा फायदा तर होईलच पण चांगला परतावा ही मिळेल.

या आहेत कसोट्या

  1. कोणताही फंड निवडण्यापूर्वी तुमच्या गुंतवणुकीचा नेमका उद्देश काय हे समजू घ्या
  2. गुंतवणुकीपूर्वी म्युच्युअल फंडाचा NAV आणि खर्च यामध्ये किती अंतर आहे, हे तपासा
  3. या म्युच्युअल फंडाचा कमीतकमी SIP किती आहे, ते पाहा. तो जर अधिक असेल तर तुमच्या महिन्याच्या बजेटवर आणि भविष्यातील इतर योजनांच्या खर्चावर मर्यादा येतील
  4. कोणत्याही फंडाची निवड करण्यापूर्वी त्याची एकूण संपत्ती (AUM) किती आहे, हे जरुर पाहा. त्यामुळे या म्युच्युअल फंडाचा योग्य पर्याय निवडण्याचा मार्ग मोकळा होईल
  5. म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन कोण करत आहे. बाजारात या फंड मॅनेजरला किती वर्षांचा अनुभव आहे, या फंडात गुंतवणूक करणारे मोठे गुंतवणूकदार कोण आहेत, याविषयीची माहिती जमा करा
  6. या म्युच्युअल फंडाचा बेंचमार्क इंडेक्स काय आहे. शेअर बाजारातील घडामोडींचा त्याच्यावर काय परिणाम होत आहे. निफ्टीनुसार त्याच्यात गती आहे का, तुम्हाला फायदा होईल का हे तपासा
  7. सर्वात महत्वाचे म्हणजे या फंडने गेल्या वर्षात कितीचा परतावा दिला, त्याची सरासरी किती याची माहिती घ्या
  8. या म्युच्युअल फंडात परतावा जोरदार असला तरी जोखीम किती आहे, अटी आणि शर्ती काय आहे, हे तपासा

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.