Personal Loan | वैयक्तिक कर्ज घेण्याकडे का वाढला ओढा? अर्थव्यवस्था काय देत आहे संकेत

Personal Loan | कोरोना काळानंतर आता सर्वसामान्य अधिक महागडे कर्ज घेण्याची जोखीम घेत आहेत.

Personal Loan | वैयक्तिक कर्ज घेण्याकडे का वाढला ओढा? अर्थव्यवस्था काय देत आहे संकेत
वैयक्तिक कर्जाचे प्रमाण वाढले
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 14, 2022 | 3:52 PM

Personal Loan | कोरोना काळात (Covid Period) महागाई (Inflation) आणि रोजगाराच्या (Jobs) संकटाने सर्वसामान्यांपुढे जगण्याचे संकट उभे ठाकले होते. आता कोरोनाचे मळभ कमी झाल्याने अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला तर काहींचा पगार पूर्ववत झाला आहे. कोरोना काळात कुटुंबाचा खर्च कमाईपेक्षा जास्त झाला. लोकांना सर्वप्रथम बचत (Savings) खर्चासाठी बाहेर काढली. त्यात मुदत ठेवी आणि सोने तारण ठेऊन कर्ज काढण्याकडे कल वाढला. मात्र कोरोनाचा कहर कमी झाल्याने थकीत क्रेडिट कार्डच्या (Credit Cards) रकमेत वाढ होऊ लागली आहे. हा खर्च भागवण्यासाठी लोकांनी वैयक्तिक कर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी लोकांनी अंदाधुंदपणे वैयक्तिक कर्ज घेण्यास सुरुवात केली आहे, असे बँकांच्या (Bank) आकडेवारीवरून समोर आले आहे.

हे का महत्त्वाचे आहे?

वाढते कर्जाचे प्रमाण हे अर्थव्यवस्थेत मागणीत वाढ झाल्याचे द्योतक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पण कमी कालावधीसाठी कर्ज घेणे योग्य मानण्यात येते. त्यानंतर कर्ज जर दीर्घकाळ घेण्याचे प्रमाण वाढले. तर त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. कारण कठिण काळात लोक व्याज भरण्यास ही सक्षम राहत नाहीत.

आकडेवारी काय म्हणते

RBIच्या आकडेवारीनुसार, भारतातील बँकांकडून घेतलेली एकूण खासगी कर्जे 35 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहेत. चलनवाढीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. जूनमध्ये महागाई 7 टक्क्यांच्यावर पोहचली. मात्र, जुलैमध्ये चलनवाढीचा दर 6.71 टक्के होता. जुलै 2022 हा सलग सातवा महिना होता, जेव्हा चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या निर्धारीत पातळीच्याही वर गेला आहे.

इतक्या कोटींची मागणी

गेल्या दोन वर्षांत वैयक्तिक कर्जांमध्ये 10 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जून-2022 मध्ये वैयक्तिक कर्जांमध्ये 18 टक्के (वर्षागणिक) दराने वाढ झाली. जुलै 2020 मध्ये वैयक्तिक कर्ज घेण्याचा दर 9 टक्के होता. याचा अर्थ कोरोना काळाच्या सुरुवातीला कर्ज घेण्याच्या प्रमाणापेक्षा आता कर्ज घेण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे.

कोरोना काळात ही कर्जाचे प्रमाण जास्त

जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये गृहनिर्माण, वाहन आणि क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जुलै-2020 ते जून-2022 या कालावधीत 4 लाख कोटी रुपयांचे गृहकर्ज घेतल्या गेले आहे. तर वाहन खरेदीसाठी 2 लाख कोटी रुपये आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 515 अब्ज रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

खासगी कर्जांची वाढ चांगली की वाईट?

या वाढत्या खासगी कर्जांमुळे दोन प्रश्न निर्माण होतात. एक लोक कर्ज का घेत आहेत आणि दुसरा त्याचा काय परिणाम होईल. खासगी कर्जामुळे अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे. कर्ज घेणे आणि परतफेड वेळेत झाल्यास हे चांगले लक्षण मानण्यात येते. तर कर्ज फेड लांबत गेल्यास सर्वसामान्य नागरीक हळूहळू खर्च टाळतात, त्यामुळे मंदी येण्याची शक्यता बळावते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें