डिजीटल सावकार..! क्रेडिट कार्ड वापरावं की वापरू नये?, फायदे-तोटे आणि धोके काय? जाणून घ्या
गावातील सावकाराने जास्तीचं व्याज लावत घरं, जमीन बळकावल्याचं चित्र आपण सिनेमामध्ये किंवा काहींनी ग्रामीण भागात पाहिलंय. आता सध्याच्या डिजिटलच्या युगात गावातील सावकाराची जागा ही तुमच्या आमच्या खिशातील क्रेडिट कार्डाने घेतलीय. प्रत्येकाचा फायदा तोटा असतो. तसाच क्रेडिट कार्डचाही फायदा तोटा आहे. मात्र वारेमाप खर्चामुळे अनेकांना नंतर भराव्या लागणाऱ्या अधिकच्या रक्कमेमुळे क्रेडिट कार्डबाबत वाईट अनुभव आहे. त्यानंतर कंपनीकडून वसूलीची पद्धतीमुळे अनेकांचा क्रेडीट कार्डबद्दल वाईट अनुभव आहे. या क्रेडीट कार्डबाबत आपण काही तांत्रिक बाबी जाणून घेऊयात.

प्रत्येकाला दिवसातून किमान एक किंवा दोनदा तरी बँकेकडून क्रेडिट कार्डसाठी फोन येतो. अनेकवेळा तुम्ही त्यांना नकार देऊनही त्यांचा फोन यायचा काही बंद होत नाही. बँक इतर कोणत्या गोष्टींसाठी नाहीपण क्रेडिट कार्डसाठी मागे लागतात. शॉपिंग मॉल, स्टेशन किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी काही तरूण-तरूणी क्रेडिट कार्ड आपल्यासाठी किती महत्त्वाचं हे समजून सांगत असतात. याच्यामागे कारणंही तितकंच मोठं आहे. क्रेडिट कार्डचं महाजाल देशभरात पसरलंय. पण तुम्हाला माहिती का तुमच्या खिशातील क्रेडिट कार्डने किती जणांना फायदा होतो? जाणून घ्या. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? बँक तुम्हाला एक असं कार्ड देते ज्यामध्ये एक ठराविक रक्कम दिली जाते. ती रक्कम तुम्ही...
