दिल्ली ते मुंबई प्रवास अवघ्या 1 तास 22 मिनिटांत; कशी असते हायपरलूप ट्रेन?

Hyperloop project | हायपरलूप कंपनीच्या माहितीनुसार दिल्ली ते मुंबई हा 1153 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी फक्त सव्वा तास लागेल. याचा अर्थ सीएसएमटी ते कर्जत या ट्रेनच्या प्रवासापेक्षाही कमी वेळात मुंबई-दिल्ली अंतर कापता येईल.

दिल्ली ते मुंबई प्रवास अवघ्या 1 तास 22 मिनिटांत; कशी असते हायपरलूप ट्रेन?
हायपरलूप

नवी दिल्ली: गेल्या काही काळापासून विस्मृतीत गेलेल्या हायपरलूप प्रकल्पाची देशात पुन्हा नव्याने चर्चा रंगू लागली आहे. हायपरलूपमुळे दिल्ली ते मुंबई हा प्रवास 1 तास 22 मिनिटांत करता येऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून व्हर्जिन हायपरलूप (Virgin Hyperloop) कंपनीकडून परदेशात यासंदर्भात चाचण्या सुरु आहेत. या तंत्रज्ञानामुळे हजारो किलोमीटरचा प्रवास अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतो. भारतामध्ये हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आल्यास दळणवळणाच्या क्षेत्रात फार मोठी क्रांती होऊ शकते.

आगामी काळात महाराष्ट्रासह देशभरात हायपरलूप प्रकल्प उभारले जाऊ शकतात. हायपरलूप कंपनीच्या माहितीनुसार दिल्ली ते मुंबई हा 1153 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी फक्त सव्वा तास लागेल. याचा अर्थ सीएसएमटी ते कर्जत या ट्रेनच्या प्रवासापेक्षाही कमी वेळात मुंबई-दिल्ली अंतर कापता येईल.

मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या 35 मिनिटांत

हायपरलूप या अत्याधुनिक परिवहन प्रणालीच्या साह्याने मुंबई ते नागपूर किंवा पुणे ते नागपूर हे अंतर ताशी 700 मैल अधिक किंवा 1125 किमी वेगाने अवघ्या 35 ते 40 मिनिटांत कापता येऊ शकेल. तर मुंबई ते पुणे हे अंतर कापण्यासाठी अवघी 21 मिनिटं लागतील. फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात या प्रकल्पाची जोरदार चर्चा होती. मात्र, महाविकासआघाडीच्या काळात कोरोना व अन्य कारणांमुळे हायपरलूप प्रकल्प जवळपास बासनात गुंडाळला गेला आहे.

हायपरलूप म्हणजे नक्की काय?

हायपरलूप तंत्रज्ञानात प्रवासासाठी कॅप्सुलच्या आकाराच्या पॉडस असतात. या पॉडस निर्वात पोकळीतील एका ट्युबमधून प्रवास करतात. हायपरलूप तंत्रज्ञानानुसार ट्यूबमधील हवा शोषणासाठी ट्यूबच्या तोंडाला अजस्त्र कॉम्प्रेसर लावलेले असतात. त्यामुळे ट्युबमध्ये पोकळी निर्माण होऊन कॅप्सुल आणि रुळांमधील घर्षण संपुष्टात येते. त्यामुळे अत्यंत वेगाने प्रवास करता येऊ शकतो.

संबंधित बातम्या:

फडणवीसांना धक्का, हायपरलूप प्रकल्प ठाकरे सरकारने गुंडाळला

पुण्याचा तनय मांजरेकर ‘हायपरलूप’मध्ये बसणारा पहिला भारतीय

मुंबई-पुणे 31 मिनिटांत, फडणवीस सरकारची ‘हायपरलूप’ला मान्यता

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI