AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI Restrictions News | या बँकांमधील ठेवीदारांना 10 हजारांहून अधिकची शिल्लक काढता येणार नाही, रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध

Reserve Bank of India | देशातील चार वेगवेगळ्या सहकारी बँकांवर देशातील केंद्रीय बँकेने निर्बंध घातले आहे. त्यामुळे या चार बँकेच्या ठेवीदारांना आता 10,000 रुपयांच्यावर रक्कम काढता येणार नाहीत.

RBI Restrictions News | या बँकांमधील ठेवीदारांना 10 हजारांहून अधिकची शिल्लक काढता येणार नाही, रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध
Reserve bank of IndiaImage Credit source: TV9
| Updated on: Jul 23, 2022 | 11:43 AM
Share

RBI Imposed Restriction News | भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) देशातील वेगवेगळ्या सहकारी बँकेांवर निर्बंध (Co-Operative Banks Restriction) लादले आहेत. या बँकांनी निर्धारीत नियमांना बगल दिल्याने केंद्रीय बँकेने त्यांना दणका दिला आहे. त्याचा परिणाम खातेदारांवरही झाला आहे. खातेदारांना (Depositor) आता त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढता येणार नाही. त्यांना आता एकवेळी केवळ 10,000 रुपये काढता येतील. या बँकांची आर्थिक परिस्थिती ही डबघाईला आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आरबीआईच्या माहितीनुसार, साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स यूनियन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, सूरी (पश्चिम बंगाल) आणि उत्तर प्रदेशातील बहराइच येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बैंक लिमिटेडवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच बिजनोर येथील युनायटेड इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेला ही नियमांकडे दुर्लक्ष करणे भोवले आहे. या बँकेच्या खातेदारांना आता खात्यातून रक्कम काढताना मर्यादा येणार आहे. तसेच त्यांच्या चिंता वाढणार आहेत. यापूर्वी आरबीआयने राज्यातील रायगड सहकारी बँकेवर नुकतेच निर्बंध लावले आहेत.

6 महिन्यांपर्यंत निर्बंध

आरबीआयच्या माहितीनुसार, पुढील 6 महिन्यांपर्यंत या सहकारी बँकांवर हे निर्बंध कायम राहतील. बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 नुसार जारी निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे, तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेवर नियम आणि मापदंडांचे उल्लंघन केल्याप्रकरणात 57.75 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रायगड सहकारी बँकेवरही निर्बंध

रिझर्व्ह बँकने (Reserve Bank Of India) रायगड सहकारी बँकेवर (Raigad Sahakari Bank) निर्बंध लादले (Imposed Restriction) आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकाला प्रत्येकी कमाल 15000 रुपये काढता येणार आहे. बँकेला नवीन कर्ज मंजूर करता येणार नाही. तसेच ठेव ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर कोणत्याही जुन्या कर्जाचे बँकेला नुतनीकरण करता येणार नाही. गुंतवणूकदारांकडून नव्याने गुंतवणूक करण्यास ही बंदी घालण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी याविषयीचे निवेदन दिले आहे, त्यानुसार, बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत आणि चालू खात्यातून 15000 रुपयांहून अधिकची रक्कम काढता येणार नाही. रायगड सहकारी बँकेवर हे निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील. निर्बंध लादताना केंद्रीय बँकेने हे स्पष्ट केले आहे की, हे निर्बंध म्हणजे रायगड सहकारी बँकेचे बँकिंग परवाना रद्द करणे असा होत नाही. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी बँकेवर लागू असतील.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.