तुम्हालाही Online shopping करायला आवडते? मग ‘या’ टीप्स फॉलो करा नक्कीच पैशांची बचत कराल

तुम्हालाही Online shopping करायला आवडते? मग 'या' टीप्स फॉलो करा नक्कीच पैशांची बचत कराल

सर्वच जण घाईगडबडीत खरेदी करतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होतं. ऑनलाईन (Online) खरेदी करताना पैशांची बचत व्हावी यासाठी आज आपण काही खास टीप्स पहाणार आहोत.

अजय देशपांडे

|

Mar 21, 2022 | 5:30 AM

मुंबईतील (Mumbai) मोहित नेहमी शॉपिंग ऑनलाईनच (Online shopping) करतो. नुकतंच त्याने सर्च करून तात्काळ एक छान हेडफोन खरेदी केलाय. हेडफोन खरेदी केल्यानंतर फक्त सहा ते सात दिवसानंतर त्याचा मित्र अंकितनं तसाच हेडफोन 500 रु. कमी किमतीत खरेदी केलाय. एका ऑनलाईन वेबसाईटवर फेस्टिव्हल ऑफरचा अंकितला हेडफोन खरेदी करताना फायदा झाला. हेडफोनसाठी 500 रुपये जास्त मोजावे लागल्यानं मोहितला आता पश्चाताप होतोय. या गोष्टीवरून आपल्या सर्व जणांना एक धडा मिळालाय. मुळात सर्वच जण घाईगडबडीत खरेदी करतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होतं. ऑनलाईन (Online) खरेदी करताना पैशांची बचत व्हावी यासाठी आज आपण काही खास टीप्स पहाणार आहोत. ऑनलाईन साईट्सवर सेल कधी येणार आहे याची वाट पाहा.फ्लिपकार्टचं बिग बिलियन डेज सेल आणि अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवर सेल तुम्हाला माहीतच असतील. यासोबतच इंड ऑफ सीजन सेलसोबतच विविध सणांच्या दिवशीहीमोठी सूट मिळत असते. तर खरेदी करताना गडबड करू नका, बचत केल्यानंतर तुम्ही मस्त पिज्जा खाऊ शकता.

वस्तू विश लिस्टमध्ये टाकण्याची सवय लावा

एखादी वस्तू तुम्हाला आवडली असेल, मात्र किंमत परवडणारी नसेल तर तुम्ही ती वस्तू विश लिस्टमध्ये टाकण्याची सवय लावा. या सवयीमुळे तुमचे पैसै कसे वाचतील ते समजाऊन घेऊयात. विश लिस्टमुळे तुम्हाला त्या वस्तूची तातडीनं गरज नाही हे लक्षात राहते. दुसरं म्हणजे विश लिस्टमधील वस्तूंवर प्राईस अलर्ट लावल्यानंतर किंमत कमी झाल्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता. गुगल बाबाचीही पैशांची बचत करण्यास मदत घ्या. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी गुगलवर ती वस्तू सर्च केल्यास तुम्हाला विविध साईटसवर त्या वस्तूची किंमत कळते. अशावेळी ज्या ठिकाणी सर्वात कमी किंमत आहे, तिथं खरेदी करा.

वस्तू खरेदी करताना डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर करा

यासोबतच डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून वस्तू खरेदी केल्यास ऑफर मिळते. ज्या ठिकाणी चांगली ऑफर मिळत असेल तिथं खरेदी करा. सध्या ऑनलाईन कूपन कोडसुद्धा मिळतात. खरेदी करताना ऑनलाईन कूपन कोड वापरल्यास पैशांची बचत होते. प्राईस ट्रॅकर एक्सटेंशनही खूप कामाची गोष्ट आहे. Google Chrome ब्राउजरमध्ये तुम्ही प्राईस ट्रॅकर एक्सटेंशनचा वापर करून पैसै वाचवू शकता. समजा Amazon वर तुम्हाला खरेदी करायचं आहे. त्यावेळी प्राईस ग्राफवर जाऊन तुम्ही त्या वस्तूच्या किंमतीमध्ये कसा बदल होत गेला पाहू शकता तसेच सध्या किती किंमत आहे याची माहिती मिळते. टेलिग्रॉमवर अनेक चॅनेल्स स्वस्त डील्सची माहिती देत असतात. तुम्ही अशा चॅनेल्स जॉईन करा, एखाद्या वेळी तुमचा फायदा होऊ शकतो.

संबंधित बातम्या

ठोक इंधन विक्रेत्या कंपन्यांनी पेट्रोलचे दर 25 रुपयांनी वाढवले; किरकोळ विक्रेत्यांवरील दबाव वाढला, भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

Bank of Baroda देतीये स्वस्तात घर खरेदीची संधी; 24 मार्चला बँकेकडून गहान संपत्तीचा लिलाव

जपानी कंपनी Suzuki Motor भारतात 1.26 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें