EPFO Update: निवृत्तीधारकांना आता डेडलाईनचं नो टेन्शन, वर्षभरात कधीही सादर करा जीवन प्रमाणपत्र!

निवृत्तीधारक कोणत्याही सार्वजनिक सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस, जवळचे ईपीएफओ कार्यालय किंवा पेन्शनिंग बँकेकडे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, असे ईपीएफओने स्पष्ट केले आहे. याशिवाय त्यांना उमंग अॅपच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्रही सादर करता येणार आहे.

EPFO Update: निवृत्तीधारकांना आता डेडलाईनचं नो टेन्शन, वर्षभरात कधीही सादर करा जीवन प्रमाणपत्र!
EPFO लवकरच जमा करेल व्याजाची रक्कम
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 1:58 PM

EPFO Latest Update: ईपीएफओने (EPFO) नुकताच निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता हयातीचा दाखला अर्थात जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) त्यांना कधीही सादर करता येणार आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची आता कोणतीही अंतिम तारीख राहणार नाही. ईपीएफओने लागू असलेली डेडलाइनची (Deadline) अट हटवली आहे. आता निवृत्तीधारक संपूर्ण वर्षभरात कधीही हयातीचा दाखला अर्थात जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, जे पुढील एक वर्षासाठी वैध असेल. म्हणजेच पेन्शनधारकाने 15 एप्रिल 2022 रोजी आपले जीवन प्रमाणपत्र सादर केल्यास पुढच्या वेळी त्याला 15 एप्रिल 2023 पूर्वी कधीही हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. निवृत्तीधारक कोणत्याही सार्वजनिक सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस, जवळचे ईपीएफओ कार्यालय किंवा पेन्शनिंग बँकेकडे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, असे ईपीएफओने स्पष्ट केले आहे. याशिवाय त्यांना उमंग अॅपच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्रही सादर करता येणार आहे.

प्रमाणपत्र एक वर्षासाठी वैध

वास्तविक, पेन्शनधारकांना (Pensioners) दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. तसे न केल्यास पेन्शन बंद होण्याचा धोका असतो. ईपीएफओ’ने आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत EPS 95 या पेन्शनधारकांना कोणत्याही मुदतीशिवाय वर्षभरात कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल, असा अहवाल नुकताच दिला आहे. हे प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षासाठी वैध असेल. म्हणजेच पेन्शनधारकाने 15 एप्रिल 2022 रोजी आपले जीवन प्रमाणपत्र सादर केल्यास पुढच्या वेळी त्याला 15 एप्रिल 2023 पूर्वी कधीही हयातीचा दाखला सादर करता येणार आहे.

या कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा

ईपीएस 95 च्या या योजनेच्या कक्षेत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो. ईपीएफओने डिसेंबर 2019 मध्ये अशा कर्मचाऱ्यांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या नियमांमध्ये बदल केला होता. ईपीएफओने दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधनही रद्द केले होते आणि लाभार्थ्यांना संपूर्ण वर्षात कधीही हयात प्रमाणपत्र सादर करण्याची परवानगी दिली होती.

ईपीएफओची ट्विटरद्वारे माहिती

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची कधीही मुभा दिली असली तरी, यामध्ये अट एकच आहे की, ज्या महिन्यात तुम्ही पहिल्यांदा जीवन प्रमाणपत्र सादर केले असेल, पुढच्या वर्षीपासून तुम्हाला त्या महिन्यापर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. जर यात तुमची चूक झाली तर तुम्हाला पुढील महिन्यापासून निवृत्ती वेतन मिळणे बंद होईल. ईपीएफओने यासंदर्भात ट्विट केले आहे की, “ईपीएस 95 निवृत्ती वेतनधारकांना आता कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, जे सादर केल्याच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध असतील.

असे करा जीवन प्रमाणपत्र सादर

या पदासोबतच पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र कसे सादर करू शकतात, हेही ईपीएफओने स्पष्ट केले आहे. निवृत्तीवेतनधारक कोणत्याही सार्वजनिक सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस, जवळचे ईपीएफओ कार्यालय किंवा पेन्शनिंग बँकेकडे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, अशी माहिती ईपीएफओने दिली आहे. याशिवाय उमंग अॅपच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्रही सादर करता येणार आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पेन्शनधारकांना पीपीओ क्रमांक, आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील आणि आधार संलग्न मोबाइल क्रमांक अशी माहिती सादर करावी लागेल.

इतर बातम्या

मालमत्ता खरेदीमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी; Bank of Baroda कडून संपत्तीचा लीलाव, खरेदीसाठी कर्जही मिळणार

तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ

CNG – PNG Price : सीएनजी, पीएनजी आणखी महाग होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.