AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Equitas SFB ग्राहकांसाठी खुशखबर! बचत आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ

इक्विटास बँके ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर वार्षिक 7.25 टक्के दराने व्याज देणार आहे. हा दर 8 दिवसांच्या एफडीसाठी ही लागू आहे. इतर मुदतीच्या ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे.

Equitas SFB ग्राहकांसाठी खुशखबर! बचत आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 11:05 AM
Share

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या (Equitas SFB ) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने बचत आणि किरकोळ मुदत ठेवींवरील (Fix Deposit) व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे दर 21 मार्चपासून लागू झाले आहेत. बँकेच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांना अधिकाधिक लाभ दिले जात आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, बचत खात्यातील (Savings Account) 5 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 7 टक्के व्याज दिले जात आहे. यापूर्वी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 5 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत 7 टक्के व्याज देत होती. आता त्यात वाढ करून खात्यातील बचत दोन कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. ग्राहकांना आता अधिकची रक्कम जमा करून अधिक व्याज मिळवता येणार आहे. बचत खात्यांवरील हे नवे दर २१ मार्चपासून लागू झाले आहेत.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांना व्याजातून अधिक कमाई करण्याची संधी मिळेल, असे म्हटले आहे. किरकोळ मुदत ठेवींवरील व्याज ज्येष्ठ नागरिकाला आता मिळणाऱ्या व्याजापेक्षा 0.5 टक्के अधिक असेल. आता ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर वार्षिक 7.25 टक्के दराने व्याज दिले जाणार आहे. हा दर 8 दिवसांच्या एफडीसाठी लागू आहे. इतर मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे.

किती व्याज मिळत आहे आवर्ती ठेवींचा (Recurring Deposit) विचार केला तर ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 7 टक्के व्याज मिळणार आहे. इतर ठेवीदारांसाठी व्याजाचा दर 6.5 टक्के असेल, त्याचा कालावधी 24 महिन्यांचा असेल. व्याज दरात वृद्धी करत अधिकाधीक ग्राहकांना बँकेशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी इक्विटास बँकेने लक्ष केंद्रित केले आहे. ज्येष्ठ नागरिक, बचत खाते आणि रिटेल डिपॉझिट अकाउंटमध्ये अधिक पैसे गुंतवतात, त्यामुळे बँक या वर्गवारीतील ग्राहकांना अधिकाधिक व्याज देत आहे. अधिक व्याजाच्या आमिषापोटी ग्राहक मोठी रक्कम बँकेत जमा करतो आणि या मोठ्या गंगाजळीमुळे बँकांना ही त्यांचे कर्ज उद्दिष्ट साध्य करुन त्यावरील व्याज रुपातून कमाई करता येते. त्यामुळे ग्राहकांसोबतच बँकेचा ही मोठा फायदा होतो. त्यासाठी व्याजदरात वृद्धी करण्यात आली आहे.

इक्विटास बँकेची स्थिती मजबूत यापूर्वी, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने सोमवारी डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 108 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो एक वर्षापूर्वीच्या तिमाहीत 111 कोटी रुपयांचा निव्वळ नफा होता. परंतू, सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत बँकेचा तिमाही निव्वळ नफा 41 कोटी रुपयांच्या तुलनेत 162 टक्क्यांनी जास्त होता. वर्षाच्या आधारावर चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत बँकेचे व्याजातून मिळालेले उत्पन्न 5 टक्क्यांनी वाढून 901 कोटी रुपये (857 कोटी रुपये) झाले आहे. Q3FY22 च्या आकडेवारीनुसार, बँकेची आगाऊ रक्कम 19,687 कोटी रुपये होती, जी वर्षानुवर्षे 13 टक्के दराने वाढत आहे.

संबंधित बातम्या : 

Gold | सुवर्ण नियंत्रण कायदा इतिहासजमा; तरीही घरात सोने ठेवण्यावर काय आहेत मर्यादा?

Petrol Diesel Prices Today : निवडणूका संपल्या, सरकारं बनली, पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली, मुंबईत पेट्रोल सव्वाशे रुपये लीटर होणार ?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.