AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहकर्जाचा EMI भरणं जड होतंय का? ‘हे’ 5 मार्ग सोडवतील समस्या

काही लोक असे असतात जे कर्ज घेऊन घर खरेदी करतात, परंतु नंतर गृहकर्जाचा मासिक EMI त्यांच्यासाठी ओझे बनतो आणि ते मासिक EMI भरण्यास असमर्थ असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अशा परिस्थितीत तुम्ही होम लोन EMI च्या समस्येतून कसे बाहेर पडू शकता. याविषयी जाणून घ्या.

गृहकर्जाचा EMI भरणं जड होतंय का? ‘हे’ 5 मार्ग सोडवतील समस्या
home loanImage Credit source: freepik
| Edited By: | Updated on: Mar 20, 2025 | 3:21 PM
Share

अनेक जण आपल्या गरजा भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. यातील एक कर्ज गृहकर्जही आहे. स्वत:चं घर विकत घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण घर विकत घेणं सोपं काम नसतं. काही लोक गृहकर्ज घेऊन घर खरेदी करतात. परंतु नंतर गृहकर्जाचा मासिक EMI त्यांच्यासाठी ओझे बनतो आणि ते मासिक EMI भरण्यास असमर्थ असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अशा परिस्थितीत तुम्ही होम लोन EMI च्या समस्येतून कसे बाहेर पडू शकता.

बहुतांश लोक गृहकर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करण्यास सुरुवात करतात. पण हे गृहकर्ज अनेकांसाठी दु:स्वप्न बनले आहे. हो. असे अनेक प्रकरणं तुम्ही देखील वाचले असतील किंवा ऐकले असतील. चला तर मग याविषयी पुढे विस्ताराने जाणून घ्या.

बचतीच्या माध्यमातून गृहकर्जाची परतफेड करा

तुम्हाला दर महिन्याला गृहकर्जाचा EMI भरणे अवघड जात असेल तर तुम्ही तुमच्या बचतीतून आपल्या कर्जाची प्रीफेड करावी. प्रीपेमेंट केल्याने ही रक्कम थेट तुमच्या मूळ रकमेपेक्षा कमी होईल, ज्यामुळे कर्जाची रक्कम कमी होईल आणि तुमचा मासिक EMI देखील कमी होईल.

कर्जाची मुदत वाढवा

गृहकर्जाचा मासिक EMI कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या कर्जाची मुदत वाढवू शकता. असे केल्याने तुमचा मासिक EMI देखील कमी होईल. मात्र, असे केल्याने तुम्हाला अधिक व्याज द्यावे लागणार आहे.

कमी EMI साठी होम लोन ट्रान्सफर करा

तुमच्या सध्याच्या बँके व्यतिरिक्त अन्य बँक कमी व्याजदराने कर्ज देत असेल तर तुम्ही तुमचे गृहकर्ज त्या बँकेत ट्रान्सफर करू शकता.

सिबिल स्कोअरच्या आधारे व्याजदर कमी करा

बँकेशी बोलून तुम्ही तुमचे व्याजदर कमी करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या चांगल्या सिबिल स्कोअरचा आधार घ्यावा.

अधिक डाऊन पेमेंट करा

गृहकर्ज घेताना जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मासिक EMI कमी होईल.

फसव्या गोष्टींना बळी पडू नका

अनेकांना आपले घर वेळेत विकत घेता येत नाही. जसजसा वेळ जातो तसतसे त्यांना स्वत:च्या मालकीची घर घेण्याची चिंता वाटू लागते. त्यांना गृहकर्ज दिसले तर ते सहज उपलब्ध होते. ग्राहकांच्या या अस्वस्थतेचा फायदा बिल्डर आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्स घेतात. ते अशा ऑफर देतात ज्यामुळे घर खरेदीदारांना वाटते की ते त्यांचे स्वप्न सहजपणे पूर्ण करू शकतात. येथेच असे ग्राहक अडकून पडतात.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.