गोल्ड स्कीममध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास काय होणार?

गोल्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतणवूक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लॉक इन पिरीयड संपण्याआधी त्याच्या वारसदारांना पैसे काढण्याची मुभा असेल. यापूर्वीही या योजनेत मुदतपूर्व पैसे काढण्याची मुभा होती.

गोल्ड स्कीममध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास काय होणार?
गोल्ड स्कीम

मुंबई: अलीकडच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सामान्य व्यक्तींना एकाचवेळेस मोठी सोने खरेदी शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण सुवर्णसंचय किंवा सुवर्ण योजनांमध्ये पैसे गुंतवतात. काहीजण गोल्ड डिपॉझिट स्कीमचा (Gold Deposit Scheme) पर्याय निवडतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

गोल्ड डिपॉझिट स्कीममध्ये गुंतणवूक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लॉक इन पिरीयड संपण्याआधी त्याच्या वारसदारांना पैसे काढण्याची मुभा असेल. यापूर्वीही या योजनेत मुदतपूर्व पैसे काढण्याची मुभा होती. मात्र, 3 ते 5 वर्षांचा लॉक इन पिरीयड नव्हता. आता ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास, कुटुंबातील सदस्य काही व्याज सोडून मुदतीपूर्वी ठेव काढू शकतात.

मध्यम मुदतीच्या सुवर्ण ठेव योजनेच्या (MTGD) बाबतीत, जेथे लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा आहे, सहा महिन्यांच्या आत ठेव काढल्यास कोणतेही व्याज दिले जाणार नाही. सहा महिने ते एक वर्षादरम्यान पैसे काढण्यासाठी लागू होणारा दर हा मूळ व्याज दर (सध्या 2.25 टक्के) उणे 1.25 टक्के असेल. एक वर्ष ते दोन वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, व्याजदर 1 टक्क्यांनी कमी होईल. त्याचप्रमाणे दोन वर्षे ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास व्याज दर उणे 0.75 टक्के असेल.

दीर्घकालीन गुंतवणूकीत काय फायदा?

दीर्घकालीन सुवर्ण ठेव योजनेसाठी (LTGD), ज्याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे आणि लागू व्याज दर 2.50 टक्के आहे, ठेवीनंतर एका वर्षाच्या आत पैसे काढण्यासाठी कोणतेही व्याज दिले जाणार नाही. जमा केल्याच्या एका वर्षाच्या आत योजना काढल्यास व्याज मिळणार नाही. 1 वर्ष ते 2 वर्षांपर्यंत पैसे काढण्यावर व्याजदर 1 टक्क्यांनी कमी केला जाईल. 2 वर्षे ते 3 वर्षे व्याजदर उणे 0.75 टक्के असेल आणि 3 वर्षे ते 5 वर्षांसाठी व्याज दर 0.25 टक्क्यांनी कमी होईल.

MTGD आणि LTGD ठेवी 5-7 वर्षे आणि 12-15 वर्षांसाठी आहेत. त्यामुळे, लॉक-इन कालावधीनंतरही, जर ठेवी काढल्या गेल्या, तर त्या मुदतपूर्व काढल्या गेल्या समजल्या जातील. अशा प्रकरणांमध्ये, मृत ठेवीदारांच्या कुटुंबीयांना देखील ठेवीदारांना दंड भरावा लागेल.

इतर बातम्या:

GST compensation: केंद्राकडून राज्ये अन् केंद्रशासित प्रदेशांना 44000 कोटी जारी, आतापर्यंत 1.59 लाख कोटी वितरीत

तर तुम्हालाही आताच बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं उरकावी लागणार, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

या दिवाळीमध्ये खास आपल्या प्रियजनांना गिफ्ट करा ‘हा’ म्युच्युअल फंड, FD पेक्षा जास्त परतावा मिळेल!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI