Gold Price: सोनं खरेदी करण्याची चांगली संधी; उच्चांकी भावापेक्षा दहा हजार रुपयांनी स्वस्त

Gold price | लसीकरणाचा वाढलेला आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे भारतात सोन्याचे भाव कमी होत आहेत. याशिवाय, अमेरिकन फेडरल बँकेकडून देण्यात आलेल्या व्याजदरवाढीच्या संकेतांमुळेही सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसून येत आहे.

Gold Price: सोनं खरेदी करण्याची चांगली संधी; उच्चांकी भावापेक्षा दहा हजार रुपयांनी स्वस्त
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: अलीकडच्या काळात एका विशिष्ट मर्यादेत वरखाली होणाऱ्या सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण होताना दिसत आहे. गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली होती. मध्यंतरीच्या काळात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली होती. त्यानंतर सोन्याची किंमत एका विशिष्ट टप्प्यातच अडकून पडली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. परिणामी सोने सार्वकालिक उच्चांकापेक्षा तब्बल 10 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. सध्या सोन्याचा भाव साधारण 46000 रुपये प्रतितोळा इतका आहे.

लसीकरणाचा वाढलेला आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे भारतात सोन्याचे भाव कमी होत आहेत. याशिवाय, अमेरिकन फेडरल बँकेकडून देण्यात आलेल्या व्याजदरवाढीच्या संकेतांमुळेही सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसून येत आहे.

सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे का?

भारतात आता सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. सध्या सोन्याचा दर गेल्या 6 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. कॉमेक्सवरील सोन्याची सध्याची किंमत $ 1750 च्या पातळीवर आली आहे, तर दुसरीकडे, MCX वर सोन्याची किंमत 46 हजारांच्या पातळीवर चालली आहे. एसपीडीआर गोल्ड ईटीएफच्या होल्डिंगमध्ये 8.1 टन घट झाली आहे. गुरुवारी ते 0.8 टक्क्यांनी कमी होऊन 992.65 टनावर आले आहे.

सोने का विकायचे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एसपीडीआर होल्डिंग्जच्या विक्रीचा मुद्दा स्पष्ट आहे, सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची आशा कमी आहे. एसपीडीआर सध्याच्या स्तरावर नफा बुक करत आहे. इक्विटी मार्केटच्या परताव्यामुळे सोन्याची उच्च पातळीवर विक्री होत आहे. येत्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची आशा कमी आहे.

आता पुढे काय?

रत्ने आणि दागिने उद्योगात एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा उद्योगाला आहे, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. पुढील तीन महिन्यांत शहरांमध्ये राहणाऱ्या भारतीयांकडून खरेदी वाढू शकते, असा त्यांचा विश्वास आहे. या कालावधीत मागणी 28 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

U-Gov Bomnibus द्वारे 17-20 ऑगस्ट 2021 दरम्यान देशातील 2,021 लोकांमध्ये एक ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या 5 पैकी तीन लोकांनी आपल्या कुटुंबासाठी सोने खरेदी करण्याविषयी बोलले आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 69 टक्के लोकांचे म्हणणे आहे की दिवाळी आणि सणासुदीला सोने खरेदीसाठी सर्वोत्तम काळ आहे.

2020 मध्ये कोविडमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रत्ने आणि दागिने उद्योगाने या वर्षी जानेवारी-मार्चमध्ये सोन्याची मागणी पुन्हा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु कोरोना विषाणूच्या महामारीची दुसरी लाटेमुळे मागणीत फारशी वाढ झालेली नाही.

संबंधित बातम्या

चांगली बातमी! 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजारांच्या खाली, जाणून घ्या नवीन दर

वाढत्या महागाईमुळे तुमच्यावरील कराचा बोजा कमी होणार, कसे ते जाणून घ्या

8.1 टन सोने अवघ्या काही तासांत विकले, सामान्य लोकांवर काय परिणाम?

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI