AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगली बातमी! 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजारांच्या खाली, जाणून घ्या नवीन दर

सुमारे 28 टक्के शहरी भारतीय पुढील तीन महिन्यांत सोन्यावर खर्च करण्याची योजना आखत आहेत. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यास सोन्याची मागणी वाढू शकते. एका सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आलीय.

चांगली बातमी! 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजारांच्या खाली, जाणून घ्या नवीन दर
Gold Price Today
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 12:54 PM
Share

नवी दिल्ली: सलग तिसऱ्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घट झालीय. कमकुवत आर्थिक आकडेवारी आणि जागतिक वाढीच्या संकटामुळे देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदीमध्ये प्रचंड घसरण झालीय. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,000 च्या खाली गेलीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याची किंमत 0.29 टक्के खाली आहे. चांदीही सोन्याच्या मार्गावर राहिलीय. डिसेंबर वायदे चांदीच्या किमतीत 0.36 टक्क्यांनी घट झालीय.

सुमारे 28 टक्के शहरी भारतीय पुढील तीन महिन्यांत सोन्यावर खर्च करण्याची योजना आखत आहेत. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यास सोन्याची मागणी वाढू शकते. एका सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आलीय.

सोने आणि चांदीची आजची नवीन किंमत (Gold Silver Price on 24 September 2021)

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 134 रुपयांनी घसरून 45,922 रुपयांवर आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1746.84 डॉलर प्रति औंस होती. त्याचबरोबर एमसीएक्सवरील डिसेंबर वायदा चांदी 220 रुपयांनी घसरून 60,569 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 22.61 डॉलर प्रति औंस होती.

दिवाळीला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाणार

2020 मध्ये कोविड 19 च्या निर्बंधांमुळे रत्ने आणि दागिने उद्योगाने या वर्षी जानेवारी-मार्चमध्ये पुनर्प्राप्तीचे संकेत दिले होते. साथीच्या दुसऱ्या लाटेने ते थांबवले. दुसरी लाट कमी झाल्यामुळे राज्य सरकार हळूहळू हालचालीवरील निर्बंध कमी करत आहेत आणि संघटित किरकोळ विक्रेत्यांना अपेक्षा आहे की, यावर्षी सणासुदीच्या काळात ग्राहकांची मागणी चांगली राहील.

मार्केट रिसर्च फर्म YouGovs च्या दिवाळी खर्च निर्देशांकानुसार, सणासुदीच्या काळात शहरी भारतीयांमध्ये खर्च वाढत आहे आणि दहापैकी तीन शहरी भारतीय (28%) पुढील तीन महिन्यांत सोन्यावर खर्च करण्याची योजना आखत आहेत. भारतातील प्रौढ ऑनलाईन लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशभरातील 2,021 प्रतिसादकर्त्यांकडून 17-20 ऑगस्टदरम्यान यू-गव्ह बॉम्निबसद्वारे दिवाळी खर्च निर्देशांकाचा डेटा ऑनलाईन गोळा केला गेला.

सणांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, या संभाव्य सोने खरेदीदारांपैकी 69 टक्के लोकांचा असा विश्वास होता की, दिवाळी आणि सणासुदीला सोने खरेदी करण्याचा सर्वोत्तम काळ आहे, जे सणासुदीच्या काळात खर्च करण्याची त्यांची प्रवृत्ती दर्शवते.

संबंधित बातम्या

वाढत्या महागाईमुळे तुमच्यावरील कराचा बोजा कमी होणार, कसे ते जाणून घ्या

Business Ideas: जबरदस्त व्यवसाय, एकदा सुरू झाल्यास पैसाच पैसा कमावणार

Good news! Price of 10 grams of gold below 46 thousand, find out the new rates

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.