DA Hike | महागाई भत्त्याने महागाईवर करा मात, केंद्राने दिले DA चे बळ

DA Hike | केंद्र सरकारने 7th Pay Commission कर्मचाऱ्यांनंतर या कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे कर्मचारी संघटनांनी डीएमध्ये वाढ करण्याची विनंती केली होती.

DA Hike | महागाई भत्त्याने महागाईवर करा मात, केंद्राने दिले DA चे बळ
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 2:13 PM

नवी दिल्ली | 25 नोव्हेंबर 2023 : केंद्र सरकारने काही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्याचे जाहीर केले होते. महागाई भत्त्यातील ही वाढ 1 जुलै 2023 रोजीपासून लागू होईल. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 15 टक्के ते 18 टक्क्यांपर्यंत वाढ होईल. त्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगातंर्गत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. अर्थ मंत्रालयाने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार महागाई भत्त्यातील वाढ 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगातंर्गत देण्यात येईल. 16 नोव्हेंबर रोजी ऑफिस मेमोरंडममध्ये याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

6 व्या वेतन आयोगातंर्गत वाढला भत्ता

ईटीच्या रिपोर्टनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पूर्व सुधारित वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 212 टक्क्यांहून 230 टक्क्यांपर्यंत पोहचला. याचा अर्थ या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 18 टक्क्यांची वाढ झाली. ही वाढ 1 जुलै 2023 रोजीपासून अंमलात आली. 18 टक्के डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात 7 हजार रुपयांची वाढ होईल.

हे सुद्धा वाचा

5 व्या वेतन आयोगानुसार डीए

5 व्या वेतन आयोगानुसार CPSEs कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना दोन श्रेणीत विभागण्यात आले आहे. पहिल्या श्रेणीतील 50 टक्के डीए विलिनीकरणाचा लाभ मिळत नाही. त्यांच्या डीएमध्ये 462 टक्क्यांहून 477 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तर दुसऱ्या श्रेणीतील डीएमध्ये 412 टक्क्यांहून 427 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

7 व्या वेतन आयोगानुसार भत्ता

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढला. महागाई भत्ता 42 टक्क्यांहून 46 टक्क्यांवर पोहचला आहे. महागाई भत्ता 1 जुलै 2023 रोजीपासून अंमलात आली. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीची घोषणा केली आहे. पण 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगातंर्गत महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली नव्हती.

निर्देशांक असा होतो जाहीर

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ग्राहक किंमत निर्देशांकावर निर्धारीत होतो. प्रत्येक महिन्याच्या शेवटी तो जाहीर करण्यात येतो. त्याआधारे महागाई भत्त्याचे गणित मांडण्यात येते. CPI(IW)BY2001=100 मार्चच्या 134.2 अंकांच्या तुलनेत मे महिन्यातील आकडा 134.7 अंक राहीला. यामध्ये 0.50 अंकांची भर पडली.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...