महिलांसाठी खुशखबर! आता रेल्वेतही मिळणार आरक्षित सीटची सुविधा, प्रवास होणार आरामदायी

महिला रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महिलांना रेल्वेतही आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी घोषणा केली आहे.

महिलांसाठी खुशखबर! आता रेल्वेतही मिळणार आरक्षित सीटची सुविधा, प्रवास होणार आरामदायी
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 11:46 AM

नवी दिल्ली : महिला रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महिलांना रेल्वेतही आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी घोषणा केली आहे. महिला प्रवाशांसाठी आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास आरामदायी होण्यास मदत होणार आहे.

बस, मेट्रोच्या धर्तीवर सुविधा

याबाबत बोलताना रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, बसमधून प्रवास करताना किंवा मेट्रोमधून प्रवास करताना महिलांसाठी आरक्षित सीटची सुविधा करण्यात येते. सीट आरक्षित असल्यामुळे त्यांचा प्रवास आरामदायी होतो. प्रवासामध्ये कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत. याच धर्तीवर आता रेल्वेमध्ये देखील महिलांना आरक्षित सीटचा लाभ देण्यात येणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये महिलांसाठी आरक्षित सीट असायला हवेत असा विचार सुरू होता आणि आता त्यावर प्रत्यक्ष अमंलबजावणी करण्यात आली आहे. महिलांना आता रेल्वेमध्ये देखील आरक्षित सीटची सुविधा उललब्ध होणार आहे.

ज्येष्ठ, गर्भवती महिलांना विशेष प्राधान्य 

ज्या लांब पल्ल्याच्या मेल गाड्या आहेत उदा: गरीब रथ, राजधानी एक्सप्रेस, दुरांतो अशा प्रत्येक गाड्याच्या  स्लिपरकोचमध्ये इथून पुढे महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित असणार आहेत. सोबतच थ्री टिअर एसी डब्यामध्ये देखील महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत. आरक्षित सीट पैकी लोअर सीट हे प्राधान्याने ज्येष्ठ महिला आणि गर्भवती महिला यांना देण्यात येणार आहेत. आरक्षित सीट सोबतच महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षीत व्हावा यासाठी देखील अनेक निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या 

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुंतवणुकदारांना साद, तरुण उद्योजकांच्या व्यवसायात गुंतवणूक करणा-या गुंतवणुकदारांशी पंतप्रधानांची चर्चा…

Petrol Rate Today | शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर

CNG, PNG च्या दरात पुन्हा वाढ; ग्राहकांना मोठा आर्थिक फटका, वर्षभरात 16 वेळेस वाढले भाव

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.