AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mini freezer | हा स्वस्तात मस्त मिनी फ्रीज पाहिलात का? विद्यार्थ्यांसाठी आहे बेस्ट, किंमत जाणून घ्या

जर तुम्ही विद्यार्थी आहात किंवा नोकरी, व्यवसायानिमित्त घरापासून दूर एकटेच राहत असाल तर आणि तुम्हाला स्वतःसाठी एक मिनी फ्रीज घ्यायचा असेल तर तुमच्या समोर गोदरेजचा चांगला पर्याय आहे. तुम्ही Godrej 30 L Qube Personal Cooling Solution खरेदी करू शकता. हे फ्लिपकार्टवर 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

Mini freezer | हा स्वस्तात मस्त मिनी फ्रीज पाहिलात का? विद्यार्थ्यांसाठी आहे बेस्ट, किंमत जाणून घ्या
स्वस्तात मस्त मिनी फ्रीज Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 25, 2022 | 6:28 PM
Share

अनेक जण नोकरी व्यवसाय किंवा विद्यार्थी असल्याने बाहेरगावी एकटेच असतात. त्यामुळे बॅचलर लाईफ (Bachelor Life) जगत असलेले लोक स्वत:साठी फार काही वस्तू खरेदी करीत नाहीत. त्यात, फ्रीज म्हटले तर एकट्या माणसासाठी फ्रीजची काय आवश्‍यकता? असा प्रश्‍न विचारला जात असतो. परंतु जर तुम्ही बॅचलर किंवा विद्यार्थी असाल आणि दुसऱ्या शहरात राहात असाल, आणि तुम्हालाही एक मिनी फ्रीज (mini freezer) पाहिजे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या उन्हाळा (Summer) सुरु असल्याने या दिवसांमध्ये फ्रीजची अत्यंत आवश्‍यकता असते. परंतु एकट्यासाठी इतका खर्च करुन फ्रीज घेणे अनेकांना पसंत नसते. परंतु दुसरीकडे फ्रीजची गरजदेखील असते. थंड पाणी, भाजीपाला, किंवा खाण्याच्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणे आवश्‍यक असतात. परंतु एकट्यासाठी कोणीही फ्रीज घेत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला एका बजेट फ्रीजच्या डिलबद्दल माहिती देणार आहोत.

बजेटमध्ये फ्रीज उपलब्ध

बरेच लोक बजेटमुळे फ्रीज घेत नाहीत. तसे असल्यास, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या लेखात अशा फ्रीजबद्दल सांगत आहोत जो तुम्हाला उन्हाळ्यात खूप उपयोगी पडेल. बॅचलर किंवा विद्यार्थी मिनी फ्रीज खरेदी करू शकतात. असाच एक मिनी फ्रीज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. त्याची किंमत खूपच कमी आहे. म्हणजेच 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही मिनी फ्रीज खरेदी करू शकता.

गोदरेज 30 एल क्यूब पर्सनल कूलिंग सोल्युशन

तुम्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून Godrej 30 L Qube Personal Cooling Solution खरेदी करू शकता. त्याची क्षमता 30 लिटर पर्यंत आहे. त्याचा आकार खूपच लहान आहे आणि आपण ते सहजपणे शेल्फमध्ये देखील ठेवू शकता गोदरेजचा हा मिनी फ्रीज कमी जागेतही ठेवता येतो. त्याचे वजनही खूप कमी आहे. यामुळे तुम्ही त्याची जागा सहजपणे बदलू शकता. तुम्ही 7,490 मध्ये गोदरेज 30 एल क्यूब पर्सनल कूलिंग सोल्युशन खरेदी करू शकता. तुम्ही ते 277 रुपये दरमहा रुपयांच्या ईएमआयवर घरी देखील आणू शकता. या फ्रीजपासून चांगली थंडावा मिळतो. पण मिनी फ्रीज असल्याने त्यात फक्त हलक्या वस्तू ठेवता येतात.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.