‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; एका वर्षात पाच लाखांचे 25 लाख

Share Market | याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनचे पाच लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 25.5 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हा समभागा ग्रीन झोनमध्ये आहे.

‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; एका वर्षात पाच लाखांचे 25 लाख
शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 10:49 AM

मुंबई: सध्या शेअर बाजारात हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन (HGS) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात Hinduja Global Solution (HGS) कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 410 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. जून 2020 मध्ये हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनच्या समभागाचा भाव 666 रुपये इतका होता. मात्र, जून 2021 मध्ये या समभागाची किंमत 3397 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनचे पाच लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 25.5 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हा समभाग ग्रीन झोनमध्ये आहे.

जून तिमाहीत हिंदुजा ग्लोबल सोल्यूशन कंपनीने 117.02 कोटींचा नफा कमावला होता. गेल्यावर्षी कंपनीला 47.94 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तसेच कंपनीची ऑपरेशनल कॉस्टही 25 टक्क्यांनी वाढून 1550.52 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. गुरुवारी भांडवली बाजार बंद होताना हिंदुजा ग्लोबल सोल्यूशनच्या समभागाची किंमत 3,235.85 रुपये इतकी होती.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

संबंधित बातम्या:

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

एका वर्षात या बँकिंग इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, सरासरी 50 टक्क्यांहून अधिक उत्पन्न

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.