AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याची शुद्धता ओळखण्याचा हा रामबाण उपाय

Bottled Water Market : देशात मिनिरल वॉटरचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. अनेक नामांकीत कंपन्या या व्यवसायात आल्या आहेत. परंतु काही ठिकाणी बॉटल बंद पाण्यातून साधे पाणी दिले जाते. त्यामुळे आजारांना आमंत्रण देण्याचा प्रकार घडतो. यामुळे आपण घेत असलेले पाणी शुद्ध आहे की नाही? हे असे ओळखा...

पाण्याची शुद्धता ओळखण्याचा हा रामबाण उपाय
| Updated on: Mar 08, 2024 | 4:37 PM
Share

नवी दिल्ली | दि. 8 मार्च 2024 : देशातील भारतात पाणी विकत घ्यावे लागणार? काही वर्षांपूर्वी याचा विचार कोणी केला नव्हता. परंतु आता काळानुसार बदल झाला आहे. प्रवास असो की कोणताही कार्यक्रम बॉटल बंद पाणी घेणे ही काळाची गरज झाली आहे. यामुळे बाजारात विविध कंपन्यांचे पाणी आले आहे. बिसलेरी (Bisleri), किनली (Kinley) या कंपन्यांचे मार्केट मोठे आहे. पण नोंदणीकृत नसलेल्या कंपन्याही पाणी विकत आहेत. काही वेळा पाणी घेताना फसवणूक होऊ शकते. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या (Packaged Drinking Water) नावावर फसवणूक होते. जुन्या बाटलीत साधे पाणी भरून विकले जाते. मग पाणी शुद्ध आहे? हे कसे ओळखावे.

ISI मार्कवर एक कोड

20 रुपयांची पाणी बॉटल घेताना ते शुद्ध आणि मिनरलयुक्त असण्याची ओळख करुन घ्या. पाण्याच्या चवीवरुन ते ओळखता येत नाही. जेव्हा तुम्ही पाण्याची बॉटल घेतात तेव्हा ISI मार्कवर एक कोड असतो. IS-14543 हा कोड पाहिल्यावर बॉटल असली की नाही, हे स्पष्ट होते.

कोड कॉपी केला असेल तर

पॅकींग असलेल्या बॉटलवर कोड कॉपी केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही कसे ओळखाल? त्यावर एक उपाय आहे. गुगल प्ले स्टोरवरुन BIS Care नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्या. अ‍ॅप इंस्टाल झाल्यावर तुम्हाला त्या बॉटलवरील कोडसंदर्भात सर्व माहिती मिळेल. तसेच हे पॅक कुठे झाले? त्याची माहिती मिळेल. अ‍ॅपमध्ये ISI लिहिलेले असणार आहे. त्यावर व्हेरिफाय लायस्नस डिटेल… या ऑप्शनवर क्लिक करा. त्यावेळी CM/L- 10 डिजिट कोड मागितला जाईल. हा कोड बॉटलवर पॅकेजिंगवरुन कॉपी करुन टाकावा लागणार आहे.

सर्वच डिटेल्स समोर येईल

कोड पाणी बॉटल पॅकेजिंगवर ISI मार्कच्या खाली असतो. तुम्हा 10 अंक असणारा कोड टाकल्यावर गो ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर सर्वच माहिती येईल. म्हणजेच हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही? पाण्यात मिनरल्स आहे की नाही? यामुळे पाण्यापासून होणाऱ्या अनेक गंभीर आजारापासून सुटका मिळू शकते.

..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.