तुमच्या नावावर फेक सिमकार्ड रजिस्टर तर नाही ना? ब्लॉक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

अनेकदा तुमच्या आयडी कार्डाच्या आधारे बनावट सिमकार्ड घेतल्याच्या तक्रारी दाखल केल्या जातात. (SIM cards are activate with My Name)

तुमच्या नावावर फेक सिमकार्ड रजिस्टर तर नाही ना? ब्लॉक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
का कापली जातात कोपऱ्यातून सिम कार्ड? जाणून घ्या यामागची कारणे


मुंबई : अनेकदा तुमच्या आयडी कार्डाच्या आधारे बनावट सिमकार्ड घेतल्याच्या तक्रारी दाखल केल्या जातात. या बनावट सिमकार्डचा वापर एखादा गुन्हा घडवून आणण्यासाठी केला जातो. तसेच या सिमकार्डचा वापर हा चुकीच्या घटना करण्यासाठी केला जातो. याच पार्श्वभूमीवर तुमच्या नावे कोणी बनावट सिमकार्ड वापरतंय का? याची माहिती आता तुम्हाला सहज मिळणार आहे. विशेष म्हणजे याबाबत तुम्ही तक्रार करुन ते सिमकार्ड ब्लॉकही करु शकता. (How to know that how many SIM cards are activated with My Name And ID Card)

🛑कसे कराल चेक? (You can check online)

याच पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. tafcop.dgtelecom.gov.in असे या वेबपोर्टलचे नाव आहे. या वेबपोर्टलद्वारे एका व्यक्तीच्या नावे किती सिम कार्ड आहेत, याची सहज पद्धतीने माहिती मिळणार आहे.

जर तुमचे आयडी प्रुफच्या आधारे तुम्ही दुसरा बनावट सिम कार्ड वापरत असेल तर तुम्ही तो नंबर ब्लॉक करु शकता. एका आयडी प्रुफच्या आधारे जास्तीत जास्त 9 सिम कार्ड जारी केले जातात.

🛑नेमकी प्रक्रिया काय? (Know what is the process)

💠यासाठी तुम्ही सर्वप्रथम tafcop.dgtelecom.gov.in या दूरसंचार विभागाच्या वेब पोर्टलवर जा.

💠यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.

💠यानंतर तुम्हाला मोबाइल नंबरवर पडताळणीसाठी एक ओटीपी येईल.

💠हा ओटीपी टाकल्यानतंर तुमचा नंबर पडताळला जाईल

💠यानंतर तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफवर चालू असलेल्या क्रमांकाची यादी दिसेल.

💠जर तुमच्या नावावर एखादे बनावट सिम चालू असल्यास तुम्ही त्याची तक्रार तिथे करु शकता.

💠ही तक्रार पोर्टलवर नोंदविली जाईल. यानंतर त्याचा त्याचा तपास केला जाईल.

💠जर ही तक्रार योग्य असल्याचे आढळल्यास तो नंबर ब्लॉक केला जाईल.

(How to know that how many SIM cards are activated with My Name And ID Card)

संबंधित बातम्या :

इन्कम टॅक्सची कामं 31 मे पूर्वी करुन घ्या, जूनमध्ये काही दिवस वेबसाईट बंद राहणार, नेमकं कारण काय?

FD, RD की NPS, गुंतवणुकीसाठीचा योग्य पर्याय कोणता? अधिक परतावा देणारी योजना कोणती?

मोठी बातमी! कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य, सर्व खर्च टाटा उचलणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI