पुढील वर्ष क्रिप्टोसाठी कसे राहणार?; जाणून घ्या भारताच्या डिजिटल धोरणाबाबत

चालू वर्ष क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूकदारांसाठी अभूतपूर्व असे राहिले आहे. 2021 मध्ये अनेक डिजिटल करन्सींनी 7000 टक्क्यांपर्यंत गुंतवणूकदारांना परतावा मिळून दिला. भारताबाबत बोलायचे झाल्यास क्रिप्टो करन्सीला अधिकृत करण्यात यावे का यावर सध्या सरकारचा विचार सुरू आहे.

पुढील वर्ष क्रिप्टोसाठी कसे राहणार?; जाणून घ्या भारताच्या डिजिटल धोरणाबाबत
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 6:45 AM

नवी दिल्ली : चालू वर्ष क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूकदारांसाठी अभूतपूर्व असे राहिले आहे. 2021 मध्ये अनेक डिजिटल करन्सींनी 7000 टक्क्यांपर्यंत गुंतवणूकदारांना परतावा मिळून दिला. भारताबाबत बोलायचे झाल्यास क्रिप्टो करन्सीला अधिकृत करण्यात यावे का यावर सध्या सरकारचा विचार सुरू आहे. मात्र अद्यापही कोणताच निर्णय होताना दिसत नाही.  क्रिप्टे चलनामध्ये चढ उतार हा अतिशय तिव्र असतो. उदा: बिटकॉनचे दर हे प्रती बिटकॉईन 65 हजारांपर्यंत पोहोचले होते. मात्र ते नंतर 30 हजार डॉलरपर्यंत खाली देखील घसरले. सध्या बिटकॉईनची किंमत 51 हजार रुपये आहे. हे सर्व चढ उतार विचारात घेता येणारे वर्ष हे डिजिटल करन्सीमधील गुंतवणुकीसाठी कसे असेल याबाबत जाणून घेऊयात.

सरकारची पॉलिसी

2022 हे वर्ष क्रिप्टो करन्सीसाठी कसे असणार हे संपूर्णपणे त्या -त्या देशातील सरकारच्या पॉलिसीवर अवलंबून असते. चीनने क्रिप्टो करन्सीवर पूर्णपणे बंदी घातली होती. देशात डिजिटल करन्सीच्या माध्यमातून काळा पैसा वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे चीनने सांगितले होते. त्याचा मोठा फटका हा क्रिप्टो मार्केटला बसला होता. भारतामध्ये देखील  क्रिप्टोला पूर्ण परवानगी द्यायची का? दिल्यास नियम काय असावेत यावर चर्चा सुरू आहे. थोडक्यात काय तर त्या-त्या देशात काय पॉलिसी ठरते त्यावर डिजिटल करन्सीचे भवितव्य अवलंबून असते.

खासगी क्रिप्टो करन्सीवर बंदीची शक्यता

भारताबाबत बोलायचे झाल्यास क्रिप्टो करन्सीला अधिकृत परवानगी द्यावी की नाही, यावर  सध्या चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारकडून क्रिप्टो करन्सीबाबत एक विधेयक तयार करण्यात आले आहे. मात्र यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यावर फासशी चर्चा होऊ शकली नाही. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार सर्व खासगी क्रिप्टो करन्सींवर बंदी घालू शकते. तसेच भारत आपली स्व: ताची डिजिटल करन्सी मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्याचे नियंत्रण हे ‘आरबीआय’च्या हातात असणार आहे. त्यामुळे डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या हातात फारच थोडे पर्याय शिल्लक राहू शकतात.

नफ्या तोट्याचे गणित परिस्थितीवर अवलंबून

क्रिप्टो करन्सीमध्ये चढ-उतार हे खूपच तीव्र असल्यामुळे मागच्या आकडेवरीवरून तिचा अंदाज लावता येत नाही. किंवा नफ्या तोट्याचे विश्लेषण देखील करता येणे अशक्य असते. गुंतवणूकदारांनी त्यावेळच्या परिस्थितीचा अभ्यास करून डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करावी. क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक ही अति जोखमीची असते. मात्र अल्प काळात डिडिटल करन्सीमधून मोठा नफा हेण्याची देखील शक्याता असते.

संबंधित बातम्या

चांगल्या बँकिंगसाठी Bad Bank :  कर्ज वसुलीसाठी नवीन प्रयोग, बँकेची बॅलन्सशीटही सुधारणार

Share Market | गुंतवा बिनधास्त, चांगला परतावा हमखास, या शेअरमधून मिळतील तुम्हाला घसघशीत परतावा

भविष्यातील कटकट टाळण्यासाठी हा बदल हवाच, वाहन नावावर करण्याची झंझट छुमंतर, या पद्धतीने करा मोटर वाहन मालकी हस्तांतरण  

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.