Mutual Funds : फ्लोटर प्लॅनमध्ये कम्पाऊंडिंगचा चमत्कार; 10 हजारांची गुंतवणुकीतून 7 लाखांचा परतावा, 5 वर्षांत व्हा मालामाल

म्युच्युअल फंडांत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये ठेवींवरील चक्रवाढीचा लाभ मिळतो. दीर्घकालीन गुंतवणुकीत हा फायदा अधिक होतो. जाणून घ्या म्युच्युअल फंडांत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि त्याच्या परताव्याविषयी...

Mutual Funds : फ्लोटर प्लॅनमध्ये कम्पाऊंडिंगचा चमत्कार; 10 हजारांची गुंतवणुकीतून 7 लाखांचा परतावा, 5 वर्षांत व्हा मालामाल
म्युच्युअल फंडImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 9:28 AM

मुंबई : म्युच्युअल फंडांच्या फ्लोटर योजनांमुळे (Mutual Fund-Floater Plan) गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. जास्त फायदा, उत्पन्न मिळण्यासाठी योग्य रोखे निवडण्याची प्रक्रिया सोपी नसते, त्यामध्ये गुंतवणूक करणे कठिण असते. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची ही समस्या सोडवण्यासाठी म्युच्युअल फंड हाऊसेस फ्लोटर योजना देतात. अशा योजनेत म्युच्युअल फंड हाऊसेस फ्लोटिंग व्याजदर लक्षात घेऊन बाँडमध्ये गुंतवणूक करतात.अधिक व्याजदर झाल्यास म्युच्युअल फंड फ्लोटर योजनेतील परतावा कमी होतो, तर व्याजदर कमी झाल्यास फ्लोटर योजनेचा परतावा वाढतो.म्युच्युअल फंडांत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये ( SIP ) ठेवींवरील चक्रवाढीचा लाभ मिळतो. दीर्घकालीन गुंतवणुकीत हा फायदा अधिक होतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्लोटिंग इंटरेस्ट फंड (ICICI Prudential Floating Interest Fund- Direct Plan) ही म्युच्युअल फंड फ्लोटर योजना असून ती प्रामुख्याने रोख्यांमध्ये गुंतवणूक करते. जे गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये निश्चित उत्पन्नाचा पर्याय शोधत आहेत त्यांच्यासाठी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.

SIP चे फायदे

जेव्हा तुम्ही एसआयपीमध्ये सतत गुंतवणूक करता, तेव्हा तुमच्या परताव्याची रक्कम पुन्हा गुंतवली जाते. म्हणजेच परतीचा संपूर्ण पैसे पुन्हा फंडात जमा होतात. याला कंपाऊंडिंग म्हणतात आणि त्याचा परिणाम थेट दिसून येतो., गुंतवणुकदाराचा पैसा अनेक पटींनी वाढतो. मात्र, जास्तीचा परतावा हवा असेल तर सहाजिकच तुम्हाला गुंतवणूक वाढवावी लागेल. तसेच लवकरात लवकर गुंतवणूक सुरु करणे हा ही एक चांगला पर्याय ठरु शकतो.

म्युच्युअल फंड एसआयपी रिटर्न्स

जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या योजनेत एसआयपीद्वारे दरमहा 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याची गुंतवणूक आज 7.17 लाख रुपयांपर्यंत वाढली असती. गेल्या एका वर्षात या फंडाने एसआयपी गुंतवणूकदारांना 1.90 टक्के निव्वळ परतावा दिला आहे, तर त्याचा वार्षिक परतावा 3.55 टक्के होता.

परतावा किती मिळाला?

गेल्या दोन वर्षांत या योजनेतील एसआयपी मोडचा निव्वळ परतावा 5.33% आहे, तर वार्षिक परतावा 5.08 टक्के मिळाला आहे. गेल्या चार वर्षांत या योजनेचा निव्वळ परतावा 9.92 टक्के तर वार्षिक परतावा 6.24 टक्के मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांत या एसआयपी योजनेने सुमारे 19.60% निव्वळ परतावा प्राप्त केला आहे, तर या योजनेचा वार्षिक परतावा 7% होता.

दरमहा 10 हजारांच्या गुंतवणुकीवर 7.17 लाखांचा परतावा

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या फ्लोटर योजनेत 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची गुंतवणूक आज 1.22 लाख रुपयांपर्यंत वाढली असती. या योजनेत त्याने तीन वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची एसआयपी वाढून 3 लाख 96 हजार रुपये झाली असती. त्याचप्रमाणे या फ्लोटर प्लानमध्ये जर एखाद्या गुंतवणुकदाराने 5 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची गुंतवणूक आज 7.17 लाख रुपये झाली असती.

इतर बातम्या

Bullock Cart Race VIDEO | वेगवान बैल जोडीसमोर मालक पडला, पायाखाली तुडवला जाणार तोच…

LSG vs SRH IPL Match Result: विजयासाठी 18 चेंडूत 33 धावा, स्ट्राइकवर होता धोकादायक पूरन, गंभीर आवेशला एवढचं म्हणाला ‘तू तुझा…’

‘तुझ्या माझ्या संसाराला..’ मालिकेतील अमृता पवारने गुपचूप उरकला साखरपुडा

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.