आरोग्य विम्याचा क्लेम मिळाला नाही तर ‘येथे’ करू शकता तक्रार, जाणून घ्या सर्व काही

विम्याची कोणतीही रक्कम 30 दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही किंवा कंपनीने अवास्तव युक्तिवाद करून तुमचा क्लेम फेटाळला असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. क्लेम नाकारल्यानंतर, तुम्ही लोकपालाकडे या प्रकरणाची तक्रार करू शकता.

आरोग्य विम्याचा क्लेम मिळाला नाही तर 'येथे' करू शकता तक्रार, जाणून घ्या सर्व काही
health insurance
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 5:26 PM

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. रुग्णालयांमध्ये खाटांच्या कमतरतेमुळे रुग्णालयाबाहेर अनेकांचा मृत्यू झाला. अशा स्थितीत सरकारी, खासगी रुग्णालयाची पर्वा न करता ज्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी जागा मिळाली त्यामध्ये ते दाखल झाले. मात्र त्यादरम्यान काही लोक असे होते ज्यांना आरोग्य विमा करूनही क्लेम मिळालेला नाही. तुम्ही जर आरोग्य विमा घेतला असेल, आणि वेळोवेळी प्रीमियम भरत असाल, परंतु नंतर तुम्हाला क्लेम मिळत नसेल, तर तुम्ही याबाबत तक्रार करु शकता.

कोरोना महामारीच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली, जेव्हा आरोग्य विमा कंपन्यांनी रुग्णांचे क्लेम वेळेवर नाकारले. आणि या नकारामागे विचित्र आणि खराब युक्तिवाद दिले गेले. वास्तविक अनेक कंपन्यांनी हे सांगून हा क्लेम नाकारला की, तुम्ही घरी राहूनही बरे होऊ शकले असते, अशा परिस्थितीत तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, त्यामुळे हा क्लेम करता येणार नाही. तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्ही तक्रार करू शकता.

विम्याची रक्कम न मिळाल्यास तक्रार करा

विम्याची कोणतीही रक्कम 30 दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही किंवा कंपनीने अवास्तव युक्तिवाद करून तुमचा क्लेम फेटाळला असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. क्लेम नाकारल्यानंतर, तुम्ही लोकपालाकडे या प्रकरणाची तक्रार करू शकता. नुकतेच, असे एक प्रकरण देखील समोर आले होते, त्यानंतर लोकपालने या दाव्याचे समर्थन केले आणि सांगितले की, जर कोणी आजारी असेल तर डॉक्टरांच्या निदानावर टीपीएचे (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशन) प्रश्न निराधार आहेत.

TPA (तृतीय पक्ष प्रशासन) कोण आहेत?

आरोग्य विम्याच्या वापरादरम्यान, प्रथम TPA (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशन) ला माहिती द्यावी लागते. TPA विमा ग्राहक आणि कंपनी यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते. त्याचा मुख्य उद्देश दावा आणि सेटलमेंट प्रक्रियेत मदत करणे हा आहे. विमा कंपन्या त्यांचा लाभ घेण्याच्या बदल्यात टीपीए देतात. पण कंपन्यांना खूश करण्यासाठी टीपीए विम्याची रक्कम कमी करण्याचा प्रयत्न करते.

खरं तर, गेल्या काही काळापासून, हॉस्पिटलायझेशन अनावश्यक असल्याचे सांगून दावे नाकारण्याच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोविडच्या शिखरावर, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती विपिन सांघी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने विमा कंपनी आणि टीपीएने 60 मिनिटांत दावा मंजूर करण्याचा आदेश दिला. मात्र आजही दाव्याची प्रकरणे निकाली निघत नाहीत.

लोकपालमधील तक्रारीची प्रक्रिया

– तुमचा दावाही फेटाळला गेल्यास, या प्रकरणाची तक्रार लोकपालाकडे करा. – ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही – तुम्ही ईमेलद्वारेही तक्रार नोंदवू शकता – देशात लोकपालची 17 केंद्रे आहेत – IRDAI च्या वेबसाइटवर (www.irdai.gov.in) माहिती उपलब्ध असेल. – कौन्सिल फॉर इन्शुरन्स ओम्बड्समन देखील मदत करू शकतात

दावा नाकारणे, दावे देण्यास उशीर होणे आणि चुकीची उत्पादने विकणे अशा तक्रारी घेऊन ग्राहक लोकपालाकडे संपर्क साधू शकतात. परंतु तक्रार करताना उपचाराशी संबंधित सर्व कागदपत्रे म्हणजेच बिल लक्षात ठेवावे. (If you haven’t received a health insurance claim, you can complain here, know everything)

इतर बातम्या

आता ईपीएफमध्ये नॉमिनी बदलणे झाले सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

भारतीयांची फसवणूक करणारे टेक सपोर्ट स्कॅम नक्की काय आहे? जाणून घ्या याबाबत सर्वकाही

Non Stop LIVE Update
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला.
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?.
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्...
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्....
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण.
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी.