LIC Scheme : योजनाच एकदम सुपरहिट! 54 लाख असे मिळतील

LIC Scheme : एलआयसीच्या अनेक योजनांपैकी ही योजना तुम्हाला मालामाल करेल. आयुष्याच्या संध्याकाळी तुम्हाला कसलीच चिंता राहणार नाही. 54 लाख रुपयांची तरतूद तुम्ही करु शकाल.

LIC Scheme : योजनाच एकदम सुपरहिट! 54 लाख असे मिळतील
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 8:15 PM

नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायक योजना आणते. एलआयसीच्या जवळपास सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी योजना आहे. निवृत्तीनंतर व्याधी, आरोग्याच्या तक्रारी, महागडे उपचार, ऑपरेशन्स, औषधांसाठी मोठा खर्च येतो. पण गाठिशी मोठी जमापुंजी नसेल तर मोठा ताप होतो. त्यामुळे एलआयसीची ही योजना तुमच्या हिताची ठरेल. या योजनेत जीवन विमाधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात येते. तर आयुष्याच्या संध्याकाळी विमाधारकाला मोठी रक्कम मिळते. दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवल्यास मॅच्युरिटी वेळी 54 लाख रुपयांची तरतूद तुम्ही करु शकाल. कोणती आहे ही योजना, तिचा काय आहे फायदा?

एलआयसी जीवन लाभ एलआयसी जीवन लाभ (LIC Jeevan Labh) योजना सुरक्षा आणि बचतीसाठी मोठी फायदेशीर आहे. ही योजना दोघांना पण मोठा फायदा मिळवून देऊ शकते. या योजनेत दरमहा बचत केल्यास मॅच्युरिटीवेळी एकरक्कमी पैसा मिळतो. या योजनेत तुम्हाला दरमहा 7,572 रुपयांची बचत करावी लागते. एलआयसी सरकारचा व्यावसायिक उपक्रम असल्याने यात पैसा बुडण्याचा कोणताही धोका नाही. इतर बचत योजनांपेक्षा यात व्याज तर मिळतेच पण जीवन विमा ही मिळतो. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर 54 लाख रुपये मिळतात.

मृत्यूनंतर वारसांना पैसा जीवन विमाधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात येते. तर आयुष्याच्या संध्याकाळी विमाधारकाला मोठी रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूकदारांना त्याच्या मनानुसार, योजनेचा हप्ता आणि कालावधी निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भविष्यातील खर्चासाठी ही योजना मोठी मदत करु शकते.

हे सुद्धा वाचा

असा मिळतो लाभ ही पॉलिसी खरेदीसाठी कमीतकमी 18 वर्ष आणि कमाल 59 वर्षांची अट आहे. जर एखाद्या व्यक्तीने 25 व्या वर्षी जीवन लाभ पॉलिसी खरेदी केली तर त्याला प्रति महिना 7,572 रुपये वा प्रति दिन 252 रुपये गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे वर्षाला 90,867 रुपये जमा होतील. विमाधारक जवळपास 20 लाख रुपये जमा करेल. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर विमाधारकाला 54 लाख रुपये मिळतील. तसेच विमाधारकाला इतर लाभ पण मिळतात.

योजनेची वैशिष्ट्ये काय या योजनेत 8 ते 59 वर्षे वयोगटातील कोणताही नागरिक गुंतवणूक करु शकतो. योजनेतंर्गत विमाधारक 10,13 आणि 16 वर्षांपर्यंत पैसा जमा करु शकतो. 16 ते 25 साली मॅच्युरिटीची रक्कम मिळेल. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना रक्कम मिळते. जर या पॉलिसीचे सर्व प्रीमियम जमा केल्यास सर्व फायदे मिळतात.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.