AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता काय भाऊ, आता फोटोवाला क्रेडिट कार्ड ! संमद्या कुटुंबालाच करा ना मग क्लिक

तर भौ जमाना नवनवीन आयडियाचा हाय. या युपीआई वाल्यांनी या क्रेडिट कार्डचं दुकान बंद करण्याचा चंगच बांधलाय जणू, तर मग क्रेडिट कार्डवाल्यांनी बी एक शक्कल लढवली आहे, फोटोवाला क्रेडिट कार्डची. क्रेडिट कार्डवर तुमचा, बायकोचा, पोरं-सोरांचा, माय-बापाचा, समंद्या कुटुंबाचाच फोटो लावा की एकदम झ्याक..

काय सांगता काय भाऊ, आता फोटोवाला क्रेडिट कार्ड ! संमद्या कुटुंबालाच करा ना मग क्लिक
आता फोटोवाला क्रेडिट कार्ड !Image Credit source: twitter
| Updated on: Apr 21, 2022 | 10:25 AM
Share

तर भौ जमाना नवनवीन आयडियाचा हाय. या युपीआई वाल्यांनी (UPI Payment) या क्रेडिट कार्डचं (Credit Card) दुकान बंद करण्याचा चंगच बांधलाय जणू, तर मग क्रेडिट कार्डवाल्यांनी बी एक शक्कल लढवली आहे, फोटोवाला क्रेडिट कार्डची (Photo Credit Card) . क्रेडिट कार्डवर तुमचा, बायकोचा, पोरं-सोरांचा, माय-बापाचा, समंद्या कुटुंबाचाच फोटो लावा की एकदम झ्याक, बरं या क्रेडिट कार्डवर तुम्हाले फसकलास डिझाईन पण करता येईल. म्हणजे कसं एकदम फक्कड. आपला, कुटुंबाचा असा कडक फोटो काढा की क्रेडिट कार्ड चमकले पाहिजे, अन्, बुवा तुम्हाले वाटलंच की जरा साधाच फोटू पाहिजे तर तसं बी चालते. क्रेडिट कार्डवाले कायले हरकत घेतील, तुमच्या फॅमिलीवाल्या फोटोले. बरं क्रेडिट कार्डावर अख्या फॅमिलीचा फोटो असला म्हणजे कसं क्रेडिट कार्ड वापरताना कोणाच्या काय जरुरती हाय ते लागलीच कळंना आणि रुसवे-फुगवे कमी होतीन. तर मग वाट कसली पाहता, नजीकच्या बँकेत चौकशी (Inquiry in Bank) करा भौ लौकर..

खासगी बँक आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) आपल्या ग्राहकांना ही अनोखी भेट उपलब्ध करुन दिली आहे. बँकेने एक्सप्रेशन क्रेडिट कार्डची सोय करुन दिली आहे. विशेष म्हणजे या क्रेडिट कार्डवर ग्राहक त्याच्या मनासारखा फोटो निवडू शकतो, त्याचे डिझाईन ठरवू शकतो. त्याची आखणी करु शकतो. या क्रेडिट कार्डवर कोणता फोटो असावा याचा निर्णय घेऊ शकतो. या कार्डसोबत ग्राहकाला अनेक सुविधा ही प्राप्त होतात. खाद्यतेल सोडून त्याला सर्व प्रकारच्या शॉपिंगवर 100 रुपयांच्या व्यवहारावर तीन पेबॅक रिवार्ड पॉईंट मिळतात. Book My Show वर तिकीट बूक केल्यास कमीत कमी दोन तिकीट खरेदीवर कमीतकमी 100 रुपयांची सूट, सवलत मिळते. विमानतळाच्या लाऊंजमध्ये त्याला प्रवेशाची विशेष सवलत मिळते.

कोटक महिंद्रा बँकेनेही (Kotak Mahindra Bank) फोटोवाला क्रेडिट कार्डची सोय करुन दिली आहे. कोटकने या क्रेडिट कार्डला My Image Credit Card असे नाव दिले आहे. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार कुटुंबाचा फोटो क्रेडिट कार्डवर चिपकावू शकतात. त्यांच्या मनाजोगते डिझाईन निवडू शकतात. तसेच त्यावर खास रंगछटा ही उधळू शकतात. बँकेकडून तुम्हाला इमेज गॅलरी दाखविली जाते, त्यानुसार डिझाईनची निवड करुन तुम्ही फोटो लावू शकता.

असा करा अर्ज फोटोवाला क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. My Image Credit Card विभागात जाऊन फोटो असलेल्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा लागेल. कोटक मोबाईल बँकिग अँपवर सुद्धा ही सुविधा आहे. त्यासाठी अप्लाय नाऊ- माय इमेज क्रेडिट कार्ड यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर क्रेडिट कार्ड-क्रेडिट कार्ड सर्व्हिस रिक्वेस्ट- माय इमेज क्रेडिट कार्ड वर जाऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल .

Nashik Municipal Election : नाशिकसह राज्यातल्या 18 महापालिका निवडणुकीवर आज सर्वोच्च न्यायलयात फैसला; निर्णयाची उत्सुकता शिगेला

Police News: पोलीस पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती! गृह खात्याचा अजब कारभार उघड

Akshay Kumar Tobacco Controversy: अक्षय कुमारने तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीतून घेतली माघार; म्हणाला, ‘मला माफ करा..’

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.