AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क घटवले, ग्राहकांना काय फायदा होणार?

Edible oil | आयात शुल्क कमी झाल्यामुळे जनतेला शेवटी खाद्यतेलांच्या किमती कमी झाल्याचे दिसले असते. पण नागरिकांना प्रत्यक्षात किती दिलासा किती मिळतो, हे पाहावे लागेल.

केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क घटवले, ग्राहकांना काय फायदा होणार?
खाद्यतेल
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 6:36 AM
Share

नवी दिल्ली: देशभरात खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने आयात शुल्क कमी केले आहे. यामुळे तेलाच्या किंमती तात्काळ खाली येतील अशी अपेक्षा आहे. मात्र, आयात शुल्क घटल्याने सरकारच्या महसूलात घट होईल.

सरकारने यापूर्वीही जून आणि जुलै महिन्यात अशी अनेक पावले उचलली आहेत. तेलाच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी आयात शुल्क कमी केले होते. एका आकडेवारीनुसार, आयात शुल्कात कपात केल्यामुळे पहिल्या एका वर्षात केंद्र सरकारच्या महसुलावर 3,500 कोटी रुपयांचा परिणाम झाला आहे. भविष्यात आणखी परिणाम दिसण्याची शक्यता आहे. सरकारकडून सामान्य लोकांना 4600 कोटी दिले जातील, जे खाद्यतेलांवर थेट लाभाच्या स्वरूपात असतील.

मध्यंतरी तेलबियांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी, 2021 आणि ऑगस्ट, 2021 दरम्यान अनेक निर्णय घेतले होते.. 30 जूनपासून कच्च्या पाम तेलावरील मानक दर १० टक्के करण्यात आला. सध्या ही सूट लागू आहे जी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू राहील. खाद्यतेलाच्या किमतींमध्ये आयात शुल्क मोठी भूमिका बजावते कारण बहुतेक खाद्यतेल भारताने आयात केले आहे. तेल आयात करण्यासाठी व्यापाऱ्यांना सरकारला शुल्क भरावे लागते. हे शुल्क जितके जास्त असेल तितके खाद्यतेलाची किंमत जास्त असेल. त्यामुळे सरकारने हे शुल्क कमी करून सामान्य ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने कोणते निर्णय घेतले?

सरकारने शुक्रवारी काही खाद्यतेलांच्या आयातीवरील आयात शुल्कात मोठी कपात केली होती. जर कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्यात आला तर तेलाच्या किंमती प्रति लिटर 4 ते 5 रुपयांनी खाली येऊ शकतात, असे जाणकरांचे म्हणणे आहे. गेल्या एका महिन्यात आयात शुल्कातील ही दुसरी कपात आहे.

सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क 30.25 वरून 24.7 टक्के केले आहे, तर रिफाईंड पाम तेलावरील आयात शुल्क 41.25 टक्क्यांवरून 35.75 टक्के केले आहे. रिफाईंड सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कही सप्टेंबरअखेर 45 टक्क्यांवरून 37.5 टक्के करण्यात आले आहे.

ग्राहकांना काय फायदा होणार?

आयात शुल्क कपातीमुळे केंद्र सरकारच्या उत्पन्नावर एका वर्षात अंदाजे 3,500 कोटी रुपयांचा परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, आयात शुल्कातील ताज्या कपातीचा संपूर्ण वर्षासाठी 1,100 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याचा अंदाज आहे, अशा प्रकारे सरकारने ग्राहकांना दिलेला एकूण थेट लाभ 4,600 कोटी रुपये आहे. आयात शुल्क कमी झाल्यामुळे जनतेला शेवटी खाद्यतेलांच्या किमती कमी झाल्याचे दिसले असते. पण नागरिकांना प्रत्यक्षात किती दिलासा किती मिळतो, हे पाहावे लागेल. कारण कच्च्या पाम तेलावरील कृषी उपकर 17.5 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, महसुलावरील सतत वाढत्या ओझ्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

आनंदाची बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता

महागाईची फोडणी तोंडाची चव घालवणार; खाद्यतेल महागले; मोहरीचाही भाव वाढणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.