AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indaineचा एक्स्ट्रा तेज सिलिंडर; हमखास14% वेळ 5 % गॅसची बचत, झटपट स्वयंपाक

Indaine ने  त्यांच्या ग्राहकांसाठी एक विशेष सिलिंडर तयार केले आहे. कंपनीने या सिलिंडरचे नाव एक्स्ट्रा तेज सिलिंडर असे ठेवले आहे, चला तर जाणून घेऊयात या सिलिंडरचे फायदे आणि त्यामुळे वेळेची कशी बचत होणारे याविषयी

Indaineचा एक्स्ट्रा तेज सिलिंडर; हमखास14% वेळ 5 % गॅसची बचत, झटपट स्वयंपाक
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 1:21 PM
Share

मुंबई :  इंडियन ऑइल ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास सिलिंडर तयार केले आहे. कंपनीने याचे नाव एक्स्ट्रा तेज असे ठेवले आहे. या सिलिंडरचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे तुमचा स्वयंपाक तयार करण्याचा  कालावधी 14 टक्के कमी होणार आहे तर तुमच्या गॅसची 5 टक्के बचत होणार आहे. तसेच स्वयंपाक ही लवकर तयार करता येईल. हे सिलिंडर निळ्या रंगाचे आहे. चला तर जाणून घेऊ कोणते ग्राहक या सिलिंडरचा फायदा घेऊ शकतात. इंडियन ऑइल गॅस सिलिंडर हा व्यावसायिक आणि इन्डस्ट्रीच्या वापरासाठी तयार करण्यात आला आहे. घरगुती वापरासाठी याचा उपयोग होणार नाही, एक्स्ट्रा तेज हा घरगुती स्वयंपाकासाठी तयार करण्यात आलेला नाही. हा मोठ्या व्यावसायिक भोजनासाठी वापर होणार गॅस आहे.

वेळेसोबत इंधनाचीही बचत

एक्स्ट्रा तेज सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे याची ज्योत तीव्र असते. हा सिलिंडर जास्त दाबाने गॅस सोडतो त्यामुळे स्वयंपाक लवकर होतो. तसेच 5 टक्‍क्‍यांपर्यंत एलपीजी गॅसची बचत होते. या सिलिंडरवर स्वयंपाक केल्यास 14 टक्‍क्‍यांपर्यंत स्वयंपाकाचा कालावधी घटविता येतो. एक्स्ट्रा तेज सिलिंडरचे प्रेशर जास्त असल्याने तो घरगुती स्वयंपाकासाठी वापरता येऊ शकत नाही. सिलिंडरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची ज्योत. या ज्योतीचे तापमान 65 डिग्री पर्यंत वाढविता येते.

कोठे मिळेल एक्स्ट्रा तेज सिलिंडर

इंडियन एक्स्ट्रा तेज सिलिंडर 19 किलो 47.5 किलो आणि 425 किलो मध्ये उपलब्ध आहे. एक्स्ट्रा तेज सिलिंडरला बुकिंग करण्यासाठी इंडियन ऑइल डिस्ट्रीब्यूटरकडे अगोदर नोंदणी करावी लागेल. अथवा इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर बुकिंग करावे. या विषयाची माहिती इंडियन ऑइलने दिली आहे. लवकरच एक्स्ट्रा तेज सिलिंडर संपूर्ण देशात विक्री करण्याची योजना असल्याचे वेबसाईटवर सांगण्यात आले आहे.

काय आहे या मागचे तंत्रज्ञान

इंडियन ऑइलने व्यवसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये calorific value ॲड असते. त्यामुळे उच्च तापमानावर स्वयंपाक करता येतो. एलपीजी सिलिंडर एक्स्ट्रा तेज नावाने तयार केले आहे. calorific value मुळे उच्चतम पातळीवर राहते.  एक्स्ट्रा तेज पायलट प्रोजेक्ट दोन वर्षांपूर्वी कर्नाटक मध्ये सुरू करण्यात आला होता. इंडियन ऑइलची रिसर्च टीम यासाठी अनेक वर्षांपासून काम करत आहे.

संबंधित बातम्या

आता ग्राहकच राजा, उत्पादनातील दोषाची बिनधास्त करा तक्रार , खटल्यांचा निकाल ही लागणार झटपट

आजपासून बँकिंग व्यवहारात होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम?

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना