आनंदाची बातमी! आता होम लोन स्वस्तात मिळणार, पोस्ट आणि HDFC बँकेची हातमिळवणी, जाणून घ्या सर्वकाही

Home loan | दुर्गम आणि बँका नसलेल्या भागांमध्ये HDFC गृहकर्ज उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे या भागीदारीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

आनंदाची बातमी! आता होम लोन स्वस्तात मिळणार, पोस्ट आणि HDFC बँकेची हातमिळवणी, जाणून घ्या सर्वकाही
पोस्टाकडून स्वस्तात गृहकर्ज
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 2:55 PM

नवी दिल्ली: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि HDFC लिमिटेड यांनी IPPB च्या सुमारे 4.7 कोटी ग्राहकांना गृहकर्ज देण्यासाठी धोरणात्मक युती जाहीर केली आहे. इंडिया पोस्ट देशभरातील ग्राहकांना एचडीएफसी होम लोन उत्पादने प्रदान करण्यासाठी 650 शाखांचे देशव्यापी नेटवर्क आणि 1,36,000 बँकिंग ऍक्सेस पॉईंट्सचा लाभ देईल. धोरणात्मक भागीदारीसाठी IPPB आणि HDFC यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

दुर्गम आणि बँका नसलेल्या भागांमध्ये HDFC गृहकर्ज उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे या भागीदारीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

गृहकर्जासाठी व्यापक नेटवर्क

IPPB सुमारे 1,90,000 बँकिंग सेवा प्रदात्यांद्वारे- पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांद्वारे गृहकर्ज देऊ करेल. करारानुसार, सर्व गृहकर्जांसाठी क्रेडिट, तांत्रिक आणि कायदेशीर मूल्यमापन, प्रक्रिया आणि वितरण हे एचडीएफसी लिमिटेडद्वारे हाताळले जाईल, तर आयपीपीबी कर्जाच्या सोर्सिंगसाठी जबाबदार असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

आयपीपीबीचे व्यवस्थापकीय संचालक जे वेंकटरामू म्हणाले की, आर्थिक समावेशनासाठी कर्जाची उपलब्धता आवश्यक आहे. कारण कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकांच्या बड्या वर्गाला गृहकर्ज देत नाही. डिजिटली सक्षम एजंट बँकिंग चॅनल वापरण्यासाठी आणि ग्राहकांच्या सर्व बँकिंग गरजांसाठी IPPB एक-स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून स्थापित करण्यात येईल.

एचडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक रेणू सूद कर्नाड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, ही संघटना सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने खूप पुढे जाईल.

पोस्टातील गुंतवणूकीवर कर्जाची सोय उपलब्ध

पोस्टातील गुंतवणूकीवर एरवीही तुम्हाला कर्ज घेण्याची सोय उपलब्ध असते. आपण ज्या वित्तीय वर्षात हे खाते उघडले, त्या आर्थिक वर्षाच्या पुढील वर्षापासून कर्जाची सुविधा उपलब्ध होते. पाच वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज दिले जाते. आपण आपल्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळवू शकता. आर्थिक वर्षात एकदाच कर्जाचा लाभ घेता येतो. पहिल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत दुसरे कर्ज मिळत नाही. तीन वर्षांच्या आत कर्जाची परतफेड केल्यास व्याजदर वार्षिक फक्त 1% असतो. तीन वर्षांनंतर कर्जाची परतफेड केल्यास व्याजदर वार्षिक 6 टक्के असतो.

संबंधित बातम्या:

धक्कादायक! ठाण्यात म्हाडाच्या घरांची खासगी बिल्डर्सकडून परस्पर विक्री

घरं घेण्यासाठी मुंबईकरांची ना ठाणे, ना नवी मुंबईला पसंती! वाचा कुठे खरेदी करतायत मुंबईकर घर खरेदी?

स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष, नवी मुंबईत नागरिकांची 20 लाखांची फसवणूक

सिडको लवकरच सात हजार शिल्लक घरांची सोडत काढणार

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.