रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, भारतीय रेल्वेने ATVM स्मार्ट कार्डची वैधता वाढवली

कोरोना प्रादुर्भावामुळे 22 मार्च 2020 पासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर उत्तर-पश्चिम रेल्वेकडून ATVM (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिग मशीन) स्मार्ट कार्डची वैधता 1 नोव्हेंबर 2021 पासून अन्य दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, भारतीय रेल्वेने ATVM स्मार्ट कार्डची वैधता वाढवली
ATVM Smart Card


मुंबई : देशाची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी भारतीय रेल्वे प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी सदैव तत्पर आणि पुढे असते. अशा भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. कोरोना प्रादुर्भावामुळे 22 मार्च 2020 पासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर उत्तर-पश्चिम रेल्वेकडून ATVM (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिग मशीन) स्मार्ट कार्डची वैधता 1 नोव्हेंबर 2021 पासून अन्य दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Indian Railways increased the validity of ATVM smart card)

ATVM कार्ड धारक कार्डमधील शिल्लक पैशाचा वापर करु शकणार

उत्तर-पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ATVM कार्ड धारकांच्या सुविधेसाठी असे कार्ड, ज्यांची वैधता 22 मार्च 2020 नंतर समात्प होत होती. मात्र, देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्याचा वापर होऊ शकला नाही किंवा करता आला नाही. अशा स्मार्ट कार्डची मर्यादा1 नोव्हेंबर 2021 पासून वाचलेल्या दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. उत्तर-पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे ATVM स्मार्ट कार्डधारक आपल्या कार्डमधील शिल्लक रक्कम पूर्ण वापरू शकतात.

काय आहे रेल्वेचं ATVM कार्ड?

भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ATVM स्मार्ट कार्डची सुविधा चालू केली होती. या कार्डच्या मदतीने कोणताही प्रवासी रांगेत उभा न राहता अनारक्षित रेल्वे तिकिट बुक करुन यात्रा करु शकत होता. या कार्डचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याचा रिचार्ज करण्यासाठी आता रांगेत उभं राहण्याचीही गरज नाही. एटीव्हीएम कार्डमध्ये रेल्वेच्या ऑनलाईन सेवेद्वारे सोप्या पद्धतीनं रिचार्ज केलं जाऊ शकतं.

ATVM कार्ड हे दिल्ली, मुंबईमधील लोकल प्रवाशांसाठी एक उत्तम साधन आहे. या कार्डमुळे रेल्वे प्रवाशांचा वेळ तर वाचतोच, सोबतच त्यांना तिकीट काऊंटरवर मोठ्या रांगेत उभं राहण्याचीही गरज पडत नाही. इतकंच नाही तर कार्डद्वारे तुम्ही तिकीट खरेदी केलं तर तुम्हाला त्यात काही सूटही मिळते.

भारतीय रेल्वेसोबत करा ‘हा’ व्यवसाय

मध्यंतरी ठप्प असलेल्या गाड्या आता पुन्हा एकदा ट्रॅकवर धावत आहेत. रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर व्यवसायाच्या संधीही वाढल्या आहेत. जर तुम्ही सुद्धा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण भारतीय रेल्वेमध्ये सामील होऊन फायदेशीर व्यवसाय सुरू करू शकता. मेक इन इंडिया धोरणांतर्गत, केवळ 50 टक्क्यांहून अधिक स्थानिक उत्पादने असलेले पुरवठादार रेल्वे वॅगन, ट्रॅक आणि एलएचबी कोचच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. त्याचवेळी, ‘वंदे भारत’ ट्रेन संचासाठी 75 टक्के इलेक्ट्रिक वस्तू मेक इन इंडिया अंतर्गत खरेदी केल्या जातील.

बाजारात सर्वात स्वस्त वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून रेल्वे कोणतेही उत्पादन खरेदी करते. अशा परिस्थितीत, तुम्हाला असे उत्पादन शोधावे लागेल जे तुम्हाला कोणत्याही कंपनी किंवा बाजारातून सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळेल. तुमच्या खर्च आणि नफ्याच्या आधारावर निविदा दाखल करता येईल. तुमचे दर स्पर्धात्मक असले पाहिजेत तरच तुम्हाला निविदा मिळवणे सोपे होईल.

इतर बातम्या :

बँक ऑफ इंडियाचा धमाका, दुसऱ्या तिमाहीत नफ्यात 100% वाढ, NPA घटला

केवळ 21 हजारात घरी न्या Honda Activa स्कूटर, वॉरंटी आणि खास फीचर्स मिळणार

Indian Railways increased the validity of ATVM smart card

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI