Indian Railway News: राजस्थान आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी Summer Special ट्रेन, वाचा सविस्तर

मुंबईः दरवर्षी उन्हाळा चालू झाला आणि कडका वाढला की, रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. कोरोना काळात ही संख्या अधिकच घटली होती. आता कोरोनाचे निर्बंध (Corona Restriction) कमी झाल्यानंतर रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक वाढू लागली आहे. उन्हाळ्याच्या या कालाखंडात रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे, वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आणि त्यावर नियंत्रण […]

Indian Railway News: राजस्थान आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी Summer Special ट्रेन, वाचा सविस्तर
एप्रिल-मे दरम्यान भारतीय रेल्वेकडून Summer Special रेल्वे सुरु
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 5:13 PM

मुंबईः दरवर्षी उन्हाळा चालू झाला आणि कडका वाढला की, रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. कोरोना काळात ही संख्या अधिकच घटली होती. आता कोरोनाचे निर्बंध (Corona Restriction) कमी झाल्यानंतर रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक वाढू लागली आहे. उन्हाळ्याच्या या कालाखंडात रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे, वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी भारतीय रेल्वेकडून समर स्पेशल ट्रेनची (Summer Special) घोषणा करण्यात आली आहे. उत्तर पश्चिम रेल्वेकडूनही (North Western Railway) या उन्हाळ्यासाठी खास रेल्वेंची घोषणा करण्यात आली आहे.

उत्तर पश्चिममधील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, उन्हाळ्यानिमित्त अजमेरपासून बांद्रा आणि जयपूर ते बांद्रा अशी रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. या रेल्वेबरोबरच जयपूर ते हैदराबाद दरम्यानही एक रेल्वे सुरु करण्यात आली आहे.

1. रेल्वे नंबर- 09039/09040 अजमेर-बांद्रा टर्मिनस-अजमेर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (9 ट्रिप)

बांद्रा टर्मिनस-अजमेर उन्हाळी विशेष साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 20 एप्रिल पासून 15 जूनपर्यंत तर बांद्रा टर्मिनसवरुन प्रत्येक बुधवारी रात्री 11.55 वाजता निघणार असून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.00 वाजता अजमेरला पोहचणार आहे. तर तिथून परत पुन्हा परतण्यासाठी न नंबर- 09040, अजमेर-बांद्रा टर्मिनस उन्हाळी विशेष साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 21 एप्रिल पासून 16 जून पर्यंत अजमेरपासून प्रत्येक गुरुवारी रात्री 11.45 वाजता रवाना होणार आहे. दुसऱ्या दिवशी ही रेल्वे दुपारी 3.45 वाजता बांद्रा टर्मिनसवर पोहचणार आहे. अजमेर पासून बांद्रापर्यंत असणारी ही ट्रेन बोरीवली, वापी, सूरत, भरुच, बडोदा, अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर, आबूरोड, फालना, मारवाड जक्शन आणि बेवर रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे.

2. रेल्वे नंबर- 09723/09724 जयपुर-बांद्रा टर्मिनस-जयपूर साप्ताहिक ग्रीष्मकालीन स्पेशल (12 ट्रिप)

ट्रेन नंबर- 09723, जयपुर-बांद्रा टर्मिनस ग्रीष्मकालीन साप्ताहिक स्पेशल ट्रेन ही 13 एप्रिल ते 29 जूनपर्यंत प्रत्येक बुधवार सकाळी 8.10 मिनिटांनी जयपूर येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी 4.55 वाजता बांद्रा टर्मिनसवर पोहचणार आहे. त्यानंतर पुन्हा ती ट्रेन नंबर- 09724, बांद्रा टर्मिनस-जयपूर ग्रीष्मकालीन साप्ताहिक स्पेशल ट्रेन 14 एप्रिल ते 30 जूनपर्यंत प्रत्येक गुरुवारी बांद्रा टर्मिनसवरुन सकाळी 9.30 वाजता रवाना होणार आहे, ही ट्रेन सकाळी 6.55 वाजता जयपूरला पोहचणार आहे.

जयपूर ते बांद्रा या दरम्यान चालणारी ही ट्रेन किशनगड, अजमेर, नसीराबाद, बिजाईनगर, मंडल, भिलवाडा, चित्तोडगड, रतलाम, बडोदा, सुरत, वापी आणि बोरीवली रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे.

हैदराबाद आणि जयपूरदरम्यान स्पेशल ट्रेन

रेल्वे नंबर 07115, हैदराबाद-जयपूर साप्ताहिक ग्रीष्मकालीन सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 1 एप्रिल ते 24 जूनपर्यंत प्रत्येक शुक्रवारी हैदराबादमधून रात्री 8.20 वाजता रवाना होणार असून रविवार सकाळी 5.25 वाजता जयपुरला पोहचणार आहे. तर ट्रेन नंबर- 07116, जयपुर-हैदराबाद साप्ताहिक ग्रीष्मकालीन सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 3 एप्रिल पासून 26 जूनपासून प्रत्येक रविवारी दुपारी 3.20 वाजता जयपूरमधून रवाना होणार आहे, आणि मंगळवारी रात्री 1.00 वाजता हैदराबादला पोहचणार आहे.

हैदराबाद ते जयपूर दरम्यान सुरु असलेली रेल्वे सिकंदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, चित्तोडगड, भिलवाडा, विजयनगर, अजमेर आणि फुलेरा रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे.

संबंधित बातम्या 

मनसे मेळाव्यात प्राजक्ता माळीची हजेरी; म्हणाली ‘जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसंच..’

Kalyan Crime : दुसऱ्याला अडकवायला गेला अन् स्वतःच जाळ्यात अडकला, बोगस डॉक्टरला पोलिसांकडून अटक

Rajsthan : करौली हिंसेनंतर राजस्थानातील ब्यावर शहरात रक्तपात, दोन गटांतील हल्ल्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.