AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे मेळाव्यात प्राजक्ता माळीची हजेरी; म्हणाली ‘जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसंच..’

दादरमधील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात दोन वर्षांनंतर गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा (MNS) मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडली. तुम्ही जसं राजकारण केलं तसंच समोरचे राजकारण करणार, असं सांगत राज यांनी भाजपच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभारावर सडकून टीका केली.

मनसे मेळाव्यात प्राजक्ता माळीची हजेरी; म्हणाली 'जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसंच..'
Prajakta MaliImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 03, 2022 | 4:59 PM
Share

दादरमधील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात दोन वर्षांनंतर गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा (MNS) मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडली. तुम्ही जसं राजकारण केलं तसंच समोरचे राजकारण करणार, असं सांगत राज यांनी भाजपच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभारावर सडकून टीका केली. या मेळाव्याला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिनेदेखील हजेरी लावली होती. त्याचे व्हिडीओ तिने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ पाहून आपण राजकीय पक्षात प्रवेश केला की काय, असा गैरसमज टाळण्यासाठी तिने कॅप्शनमध्ये सुरुवातीलाच स्पष्ट केलं. ‘काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली’, असंदेखील तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

‘नाही नाही, कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती) ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय, इतकाच हेतू. कलाकारनंतर आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे. त्याच्या समृद्धीकरता पण झटायला हवं. जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसंच हेही, म्हणून हा घाट. (After all आता माझ्या आधार कार्डवर मुंबईचा पत्ता आहे), अशी पोस्ट प्राजक्ताने लिहिली आहे. यासोबतच तिने #सर्वांगीणविकास #समग्रजीवन #राजकारण #मुंबई असे हॅशटॅग दिले आहेत.

प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘कौतुक करावं तेवढं कमीच’, असं एकीने लिहिलंय. तर कसा होता अनुभव, असा प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला. ‘काही का असेना पण हा वेळ वाया जाणार नाही, काहीतरी फायदा नक्कीच होणार’, असंही एकाने म्हटलं.

हेही वाचा:

Tu Tevha Tashi: अभिनयावरील प्रेमापोटी सोडली नोकरी; रिॲलिटी शोमध्येही कमावलं नाव

शाहरुख, सलमान, सैफ, अक्षयने सौदी अरबच्या मंत्र्यांची घेतली भेट; नेमकं काय आहे कारण?

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....