महागाईचा फटका विम्यालाही; हप्त्यासाठी मोजावे लागतायेत अधिक पैसे

अजय देशपांडे

Updated on: May 10, 2022 | 2:44 PM

कोरोनानंतर लोकांमध्ये विम्याबाबत जागृती वाढल्याने अचानक विम्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने विम्याच्या खर्चात देखील वाढ झाली आहे.

महागाईचा फटका विम्यालाही; हप्त्यासाठी मोजावे लागतायेत अधिक पैसे
Image Credit source: टीव्ही9

मुंबई : आज आपण महागाई (Inflation) आणि विम्याबद्दल (Insurance) बोलणार आहोत. साबण, पेट्रोल-डिझेल, दूध-लोणी मोबाईलच्या दरासोबत विम्याचे दरदेखील वाढले आहेत. विम्याचे दर वाढल्याने विमा खर्च लोकांची डोकेदुखी ठरत आहे. पॉलिसीचे (Policy) नूतनीकरण करण्यासाठी विमा एजंट अधिक पैसे मागत आहेत. केवळ जीवन जगण्याचाच खर्च नाही तर नुकसानीपासून वाचण्यासाठी जोखीमेची किंमतही वाढली आहे. जीवन विमा गेल्या 2 वर्षात 30 टक्के महाग झाला आहे आणि भविष्यात तो आणखी महाग होण्याची शक्याता आहे. दुसरीकडे आरोग्य विमा, कार विम्याचा प्रीमियम देखील सरासरी 10 टक्क्यांहून अधिक वाढल्याचे एलआयसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.कोरोनाने संपूर्ण विमा बाजाराचे चित्रच बदलून टाकले आहे. कोरोनापूर्वी दाव्याचं प्रमाण कमी होतं आणि लोक विम्याबद्दल एवढे जागरूक नव्हते. मात्र कोरोनानंतर अचानक विम्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने विम्याचा प्रमियमही वाढला आहे.

25,000 कोटी रुपयांची नुकसान भरपाई

उदाहरणासाठी आपण आरोग्य विमा घेऊयात, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये विमा कंपन्यांनी मेडिकल क्लेम म्हणून 7,900 कोटी रुपये भरपाई दिली. 2021-22 मध्ये कोरोनामुळे दाव्यात वाढ झाली. दाव्यात वाढ झाल्याने विमा कंपन्यांना तब्बल 25,000 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली. इनशयूरन्स क्लेमच्या वाढीसह पुनर्विम्याची किंमत देखील 40 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. पुनर्विमा म्हणजे जेव्हा विमा कंपनी क्लेमविरुद्ध स्वतःचा विमा काढते. जसे RBI ही बँकांची बँक आहे. त्याचप्रमाणे विमा कंपनीचा विमा उतरवणारी कंपनी पुनर्विमा कंपनी म्हणून ओळखली जाते. या सर्व काराणांमुळे विमा कंपन्यांकडून जवळपास सर्वच प्रकारच्या विम्याची रक्कम वाढवण्यात आली आहे.

जीवन विम्याची मागणी वाढण्याची शक्यता

अलीकडेच एसबीआयने जीवन विम्यावरील अहवाल प्रकाशित केला. यामध्ये असे आढळून आले की, कोरोनानंतर विम्याच्या मागणीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये आरोग्य आणि जीवन विम्याला मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे. आरोग्य आणि जीवन विम्याची वाढती मागणी पहाता पुढील काळात त्याच्या प्रिमयममध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI