एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करताय, पँट्री बंद असेल तर ऐनवेळी जेवण कसे ऑर्डर कराल?

IRCTC Railway | रेल्वेकडून एक्स्प्रेस गाड्यांमध्ये असणारी नेहमीची कॅटरिंग सेवा अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. त्यामुळे ई-कॅटरिंग सेवा ग्राहकांसाठी दिलासा ठरणार आहे.

एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करताय, पँट्री बंद असेल तर ऐनवेळी जेवण कसे ऑर्डर कराल?
रेल्वे खानपान सुविधा

नवी दिल्ली: देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर आता IRCTC कडून ई-कॅटरिंग सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ऑनलाईन जेवण ऑर्डर करता येईल. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता ट्रेनने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी ई-कॅटरिंग सेवा पुन्हा सुरु झालेय.

रेल्वेकडून एक्स्प्रेस गाड्यांमध्ये असणारी नेहमीची कॅटरिंग सेवा अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. त्यामुळे ई-कॅटरिंग सेवा ग्राहकांसाठी दिलासा ठरणार आहे. यामध्ये तुम्हाला हवे असलेले खाद्यपदार्थांची ऑर्डर ऑनलाईन देऊ शकता. त्यानंतर ट्रेनमध्ये तुमच्या आसनापर्यंत हे पदार्थ पोहोचवले जातील.

कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून रेल्वेतील खाद्यपदार्थ आणि पँट्री सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांवर उपाशीपोटी प्रवास करण्याची वेळ ओढावली होती. मात्र, आता प्रवासी www.ecatering.irctc.co.in या संकेतस्थळावर जाऊन जेवणाची ऑर्डर नोंदवू शकतात. याठिकाणी तिकीटावरील दहा अंकांचा PNR नंबर द्यावा लागेल. त्यानंतर तुम्ही फुड कॅफे, आउलटलेट आणि क्विक सर्विस रेस्टॉरंटची निवड करु शकता. याठिकाणी तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्यायही उपलब्ध आहे.

ट्रेनच्या तिकिटांवरील सवलती पुन्हा सुरु कधी होणार?

कोरोनाकाळात रेल्वे तिकीटांच्या दरात वाढ झाली आहे. हे दर कमी होतील, अशी आशा सामान्य नागरिकांना आहे. मात्र, इंधनाच्या दरांप्रमाणे याठिकाणीही सामान्य लोकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता अधिक आहे. कारण केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेला दिलेल्या लिखीत स्पष्टीकरणातून तसे संकेत मिळत आहेत.

अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे राज्यसभेला दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला रेल्वेच्या तिकीटांवर कोणतीही सूट देण्याचा मंत्रालयाचा विचार नाही. तसा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून रेल्वेकडून तिकीटांवर देण्यात येणारी सूट पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.

कोरोनापूर्व काळात भारतीय रेल्वेकडून दिव्यांग व्यक्ती, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना तिकीटांवर सवलत दिली जात होती. मात्र, आता कोरोनामुळे ट्रेनमध्ये मर्यादित प्रवाशांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे रेल्वेकडून तिकीटांवरील सर्वप्रकारच्या सवलती बंद करण्यात आल्या आहेत.

संंबंधित बातम्या:

Indian Railway: रेल्वेने प्रवास करताय तर गाईडलाईन्स नक्की वाचा, अन्यथा बसेल मोठा फटका

विमान प्रवाशांसाठी अलर्ट ! आता विमानात बसून बुक करता येणार टॅक्सी, या विमान कंपनीने सुरू केली ही सेवा

टोलनाक्यांवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता टोलचे पैसे कापण्यासाठी नवी यंत्रणा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI