खरंच अग्निवीरांना लग्न करण्याची परवानगी नाही? जाणून घेऊया
अग्निवीर, ही अशी सरकारी नोकरी आहे ज्यामध्ये कोणत्याही अग्निवीरला कार्यकाळात लग्न करण्याची परवानगी दिली जात नाही. तब्बल ४ वर्षाच्या कार्यकाळात लग्न करत येणार नाही. जर कोणता ही उमेदवार लपून किंवा फसवून लग्न केल्यास त्याझावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.

“अग्निवीर” ही अशी सरकारी नोकरी आहे ज्यामध्ये कोणत्याही अग्निवीरला कार्यकाळात लग्न करण्याची परवानगी दिली जात नाही. भारतीय लष्कराच्या नियमांनुसार केवळ अविवाहित लोकच अग्निवीरसाठी अर्ज करू शकतात. सरकारी नोकरी मिळाल्यावर सगळ्यात आधी लोक लग्नाचा विचार करतात, मग तो पुरुष असो किंवा स्त्री. अशा परिस्थितीत अग्निवीरांसाठी लग्नाचे काय नियम आहेत, ते जाणून घेऊया.
अग्निवीरने सेवेपूर्वी किंवा कार्य चालू असताना लग्न केल्यास भारतीय लष्कर त्याच्यावर कारवाई करू शकतो, कसं ते जाणून घेऊया :- वास्तविक, भारतीय आर्मिने पुन्हा एकदा अग्निवीरांसाठी भरतीची सूचना जाहीर केली आहे. यासाठी ११ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आणि नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. भारतीय आर्मीकडून पुन्हा एकदा अग्निवीरांची भरती सुरू झाल्यानंतर देशातील हजारो तरुण आता तयारीत व्यस्त आहेत. अर्ज लवकरच सुरू होतील ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतील. अशा परिस्थितीत, त्याच्याशी संबंधित सर्व नियम सखोलपणे जाणून घेणे आणि आधीच मानसिक तयारी करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून काम करताना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.
केवळ अविवाहित लोकच अर्ज भरू शकतात?:- अग्निवीर फॉर्म भरण्यासाठी, तुम्हाला इतर पात्रता सोबतच अविवाहित राहावे लागेल. कारण तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही अग्निवीरसाठी पात्र ठरले नाही जाणार. त्यानुसार तुम्ही अग्निवीर फॉर्म भरू शकत नाही. फॉर्म भरताना तुम्ही अविवाहित आहात की नाही हे सांगावे लागते. नामनिर्देशन करताना, उमेदवारांना त्यांचे अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागते. अग्निवीर झाल्यानंतरही तुम्हाला लग्न करता येणार नाही. म्हणजे कोणताही अग्निवीर त्याच्या ४ वर्षांच्या कार्यकाळात लग्न करू शकत नाही. जर केल्यास तर तुम्हाला काढून टाकले जाऊ शकते. भारतीय आर्मीच्या नियमांनुसार, जर एखादा अग्निवीर अविवाहित असल्याचे खोटे बोलून अग्निवीर बनला व नंतर तो आधीच विवाहित असल्याचे लक्षात आले, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याला सेवेतून काढण्यात येईल. याशिवाय कोणत्याही उमेदवाराने आपल्या कार्यकाळात विवाह केल्यास त्याला तसे करण्याची परवानगी दिली जाणार नाही.