Government GEM Online Platform | फ्लिककार्ट नी अॅमेझॉनपेक्षा ही स्वस्त! इथं होतेयं वस्तूंची दाबून खरेदी

GEM Online Shopping Platform | फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर ( Flipkart Amazon ) सेल, महासेल सातत्याने सुरू असतात. काही ऑफर्सही मिळतात. पण याहून स्वस्त असणारा सरकारचा स्वतःचा शॉपिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला माहिती आहे का?

Government GEM Online Platform | फ्लिककार्ट नी अॅमेझॉनपेक्षा ही स्वस्त! इथं होतेयं वस्तूंची दाबून खरेदी
स्वस्तात करा ऑनलाईन शॉपिंगImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 1:39 PM

GEM Online Shopping Platform News | फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर ( Flipkart Amazon ) सेल, महासेल सातत्याने सुरू असतात. काही ऑफर्सही मिळतात. या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर (E Commerce Platform) स्वस्तात (Cheaper) वस्तू मिळत असल्याने, त्यावर ऑफर्सचा धडका असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहक ऑनलाईन शॉपिंगकडे (Online Shopping) वळला आहे. या प्लॅटफॉर्मवर दररोज हजारो वस्तूंची विक्री केल्या जाते. परंतू, याही पेक्षा अजून एक स्वस्त शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे आणि विशेष म्हणजे यावरील मालाला सरकारकडूनच हमी मिळते. येथील मालाचा दर्जा (Quality of goods) उत्तम असून सरकारकडून मालाची काटेकोर पडताळणी होते. दर्जासोबतच किंमतीत ही स्वस्त असल्याने अनेक भारतीय ग्राहक या ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे वळाले आहेत. विशेष म्हणजे जागतिक संस्थांनी या शॉपिंग मॉलमधील किंमती अत्यंत स्वस्त असल्याचे निरीक्षण सर्व्हेअंती नोंदवले आहे.

काय आहे नाव ?

सरकारच्या या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे नाव जेम असं आहे. त्याच्या अधिकृत संकेतस्थळ gem.gov.in असं आहे. या ठिकाणी तुम्ही सहज इतर शॉपिंग वेबसाईटप्रमाणेच वस्तू निवडू शकता, ऑर्डर बूक करु शकता. रक्कम अदा करु शकता. या संकेतस्थळावरून अत्यंत स्वस्तात वस्तू उपलब्ध होत असल्याचेही आर्थिक सर्वेक्षणात आढळून आले आहे. जर तुम्ही येथून Amazon आणि Flipkart वर उपलब्ध वस्तूंच्या किंमतींची तुलना केली तर तुम्हाला फरक लागलीच लक्षात येईल.सरकारी ई-मार्केटप्लस जेईएमने  (Government e-Marketplace portal- GeM)ग्राहकांना इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपेक्षा स्वस्त आणि टिकाऊ वस्तू उपलब्ध करुन दिल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

अशी आहे स्वस्ताई

विविध वस्तूंच्या किंमतीची तुलना अॅमेझॉन, फ्लिपकार्टAmazon, Flipkart सारख्या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या (Online Platform)किंमतींशी करण्यात आली. त्यावेळी जीईएमच्या किंमती अॅमेझॉनसह फ्लिपकार्टपेक्षा 9.5% कमी असल्याचे आर्थिक सर्वेक्षण (economic survey) 2021-22 मधील विश्लेषणात सोमवारी दिसून आले. इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपेक्षा नमुना पद्धतीने घेण्यात आलेल्या 22 पैकी 10 वस्तूंच्या किंमती जीईएम पोर्टलवर स्वस्त असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. जीईएमला अधिकाधिक लोकाभिमूख केल्यास या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला तगडा प्रतिस्पर्धी तयार होऊ शकतो. त्यादृष्टीने केंद्र सरकार पाऊले टाकणार असून जीईएमच्या किंमती कमी असल्याने ग्राहक आपोआप या प्लॅटफॉर्मकडे वळतील अशी आशा आहे. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर किंमती कमी असल्या तरी वस्तूंच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आलेली नाही.

सरकारी कार्यालयांसाठी खरेदी बंधनकारक

सरकारने 2016 मध्ये  दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी जीईएम या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली. खरेदीसाठी ही एक सोपी, पारदर्शक आणि पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया आहे. जनरल फायनान्शियल रूल्स (financial Rules) 2017 नुसार सर्व मंत्रालये आणि विभागांना जीईएमकडून  उपलब्ध वस्तू आणि सेवा खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पोर्टलवर पहिल्या पाच श्रेणीतील वस्तुंच्या किंमतीवर 23.5% ते 60.5% पर्यंत बचतीचे उद्दिष्टय साध्य झाले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.