AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder: एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी घेताना या 4 गोष्टी आवर्जून तपासा

घरात एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, कोणत्या गोष्टी तपासून घ्यायला हवेत, त्याबद्दल जाणून घ्या.. या चार गोष्टी तपासून घेतल्यास तुम्हाला पुढे कोणतीही समस्या येणार नाही.

LPG Cylinder: एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी घेताना या 4 गोष्टी आवर्जून तपासा
LPG cylinder delivery (AI Image)Image Credit source: ChatGPT
| Updated on: Apr 12, 2026 | 3:46 PM
Share

मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम इतर देशांसह भारतावरही झाला आहे. अनेक राज्यांमधून एलपीजी सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याच्या आणि अंशतः तुटवड्याच्या तक्रारी समोर येत आहे. अशातच घरपोच डिलिव्हरी घेताना ग्राहकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला पुढील समस्या टाळता येतील. एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स जाणून घ्या ..

सेफ्टी कॅप आणि सील तपासून घ्या: डिलिव्हरी बॉयकडून सिलिंडर घेताना नोजलवरील सील किंवा सेफ्टी कॅपकडे लक्ष द्या. सिलिंडर सील केलेलं नसेल तर ताबडतोब डिलिव्हरी बॉयकडून दुसरा सिलिंडर मागा. सेफ्टी कॅप किंवा सील नसल्यामुळे सिलिंडरमधील गॅस गळतीची शक्यता वाढू शकते.

वजन तपासून घ्या: डिलिव्हरी बॉय कडून सिलिंडर स्वीकारण्यापूर्वी त्याचं वजन नक्की तपासा. सिलिंडर स्वीकारल्यावर इलेक्ट्रॉनिक किंवा मॅन्युअल काट्यावर त्याचं वजन करून घ्या. जर तुम्हाला वजन थोडं कमी असल्याचं आढळलं किंवा काही काही संशय असेल तर तो सिलिंडर स्वीकारू नका किंवा डिलिव्हरी बॉयकडून बदलून दुसरा सिलिंडर घ्या.

गळती तपासा: डिलिव्हरी बॉयकडून नवीन सिलिंडर मिळाल्यावर त्यात गळती नाही ना, हे नक्की तपासा. गळती असलेल्या सिलिंडरमुळे तुम्हाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डिलिव्हरीच्या वेळी तुम्हाला कोणतीही गळती आढळल्यास ताबडतोब डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीकडे दुसऱ्या सिलिंडरची मागणी करा. याव्यतिरिक्त तुम्हाला नवीन सिलिंडर मिळाल्यानंतर तो स्टोव्हला लावल्यावर गळती आढळली तर सेवा पुरवठादाराशी संपर्क साधा.

सेफ्टी टेस्टिंग कोड पहा: सिलिंडर स्वीकारताना त्याचा सेफ्टी टेस्टिंग कोड नक्की तपासून पहा. वर्षाच्या कोणत्या तिमाहीत सिलिंडर पुन्हा तपासणीसाठी पाठवणं आवश्यक आहे, हे या कोडवरून समजतं.

A : जानेवारी – मार्च (पहिली तिमाही) B : एप्रिल – जून (दुसरी तिमाही) C : जुलै – सप्टेंबर (तिसरी तिमाही) D : ऑक्टोबर – डिसेंबर (चौथी तिमाही)

सिलिंडर डिलिव्हरीला किती वेळ लागणार?

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं की, एलपीजी सिलिंडर वितरणाला पूर्वीपेक्षा थोडा जास्त वेळ लागत आहे. “पूर्वीच्या तुलनेत सिलिंडर वितरणात थोडा विलंब होत आहे. पूर्वी सिलिंडर दोन ते तीन दिवसांत मिळायचं, पण आता नागरिक घाबरून अधिक प्रमाणात बुकिंग करत आहेत. त्यामुळे डिलिव्हरीला चार ते पाच दिवस किंवा काही ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त काळ लागू शकतो”, असं त्या म्हणाल्या. ही परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत