लडाख फिरण्याची इच्छा आहे? IRCTC च्या ‘या’ प्लॅनमुळे लांब पल्ल्याची ट्रीपही स्वस्त

अनेक पर्यटकांना भारतातील लेह-लडाख हा हिमालयातील प्रदेश पाहण्याचं स्वप्न असतं. आता हे स्वप्न पूर्ण करणं अगदी सोपं आणि स्वस्त झालंय.

लडाख फिरण्याची इच्छा आहे? IRCTC च्या 'या' प्लॅनमुळे लांब पल्ल्याची ट्रीपही स्वस्त


मुंबई : अनेक पर्यटकांना भारतातील लेह-लडाख हा हिमालयातील प्रदेश पाहण्याचं स्वप्न असतं. आता हे स्वप्न पूर्ण करणं अगदी सोपं आणि स्वस्त झालंय. मागील काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे अनेक लोक घरातच बंद होते. मात्र, आता बाहेर पडून मोकळा श्वास घेत स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी संधी आहे. यासाठी आयआरसीटीने एक चांगला प्लॅनही दिलाय. यामुळे अगदी स्वस्तात पर्यटकांना आपला लडाखचा प्लॅन पूर्ण करता येणार आहे (Know all details about IRCTC Ladakh trip package in cheapest rate for tourist).

आयआरसीटीच्या या प्लॅनमध्ये पर्यटकांच्या फिरण्यासह राहण्याची व्यवस्थाही करण्यात आलीय. पर्यटकांना केवळ हिमालयाच्या पर्वत रागांमध्ये बर्फाळ प्रदेशात फिरायचं आहे.

कधी कधी असणार हे पॅकेज?

आयआरसीटीसीचं हे ट्रीप पॅकेज 3 जुलै, 17 जुलै, 31 जुलै, 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही सहल 6 रात्री आणि 7 दिवसांची असणार आहे. यात लेह, शाम व्हॅली, नुबरा, टुरटुक, पँगॉन्ग इत्यादी ठिकाणांना भेट देता येणार आहे. ही ट्रिप दिल्लीमधून सुरू होईल आणि तुम्हाला 7 दिवसांनंतर सर्व ठिकाणं पाहून झाली की पुन्हा दिल्लीत आणून सोडेल. या पॅकेजमध्ये फ्लाईट, हॉटेल, खाणं पिणं सर्व खर्च आयआरसीटीसी करेल.

आयआरसीटीसीकडून कोणत्या सेवा-सुविधा

दिल्ली-लेह-दिल्ली ट्रिपमध्ये पर्यटकांना 6 ब्रेकफास्ट, 6 लंच आणि 6 डिनर दिले जातील. यात विमान प्रवासाशिवाय स्थानिक पातळीवर शेयरिंग व्हेईकलने फिरवलं जाईल. ट्रिपमध्ये 3 दिवस लेह आणि 1 दिवस पँगोंगमध्ये मुक्काम असेल. तसेच 2 दिवस नुबरा व्हॅलीत टेंटमध्ये थांबता येणार आहे. पर्यटकांना काही ठिकाणी एट्रान्स फीस द्यावी लागेल. याशिवाय आपतकालीन उपयोगासाठी ऑक्सीजन सिलेंडरची व्यवस्था देखील केली जाणार आहे. प्रत्येक पर्यटकाचा विमा काढला जाणार आहे.

किती खर्च येणार?

आयआरसीटीसीकडून देण्यात येणाऱ्या या पॅकेजची किंमत 30 हजार 305 रुपये (डबल बुकिंग) इतकी आहे. जर तुम्ही केवळ एकट्यासाठी बुकिंग करणार असाल तर जास्त पैसे द्यावे लागतील.

हेही वाचा :

IRCTC वरुन ट्रेन, फ्लाईट बूक केली, आता बाईकही बूक करण्याची संधी, ‘ही’ ट्रिप तुमचा आनंद द्विगुणीत करेल

IRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार !

IRCTC Push Notification | ट्रेन तिकीटच्या बुकिंगसाठी भटकणं बंद, आता मोबाईलवर मिळणार सर्व माहिती

व्हिडीओ पाहा :

Know all details about IRCTC Ladakh trip package in cheapest rate for tourist

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI