IRCTC वरुन ट्रेन, फ्लाईट बूक केली, आता बाईकही बूक करण्याची संधी, ‘ही’ ट्रिप तुमचा आनंद द्विगुणीत करेल

आयआरसीटीसीने एक आणखी खास पॅकेज आणलंय. मात्र याचं वैशिष्ट्य म्हणजे या पॅकेजमध्ये ट्रेन, फ्लाईट नाही तर बाईक बुकिंग होणार आहे.

IRCTC वरुन ट्रेन, फ्लाईट बूक केली, आता बाईकही बूक करण्याची संधी, 'ही' ट्रिप तुमचा आनंद द्विगुणीत करेल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 18, 2021 | 5:31 AM

मुंबई : IRCTC च्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही ट्रेन किंवा फ्लाईटचं तिकिट बूक केलं असेल. IRCTC पॅकेजचा उपयोग करुन लोक वेगवेगळ्या भागांमधील सहली करतात. आता याच आयआरसीटीसीने एक आणखी खास पॅकेज आणलंय. मात्र याचं वैशिष्ट्य म्हणजे या पॅकेजमध्ये ट्रेन, फ्लाईट नाही तर बाईक बुकिंग होणार आहे. यानंतर तुमची ट्रिपही बाईकवरच होईल. ही बाईक ट्रिप मनाली आणि लेह-लडाखचा प्रवास गाडीवर करु इच्छिणाऱ्या रायडर्ससाठी आहे (IRCTC offer package for Manali Leh Srinagar bike tour know how to book).

या पॅकेजमध्ये बाईकवरुन मनाली-लेह-श्रीनगरचा प्रवास करता येणार आहे. यात तुम्हाला बाईकवरुन लडाख जावं लागेल. यासाठी तुमच्या राहण्यापासून खाणं-पिणं सर्व सोय आयआरसीटीसीकडून करण्यात येईल.

या पॅकेजमध्ये काय आहे?

या पॅकेजचं वैशिष्ट्यं म्हणजे यात मनाली-लेह-श्रीगनगर प्रवास करण्यासाठी बाईक दिली जाईल. त्यामुळे कमी वेळेत लांबचं अॅडव्हेंचर करण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

कुठून सुरु होणार प्रवास?

हा प्रवास दिल्लीपासून सुरू होणार आहे. पुढे वोल्वोतून दिल्ली ते मनाली प्रवास होईल. यानंतर मनालीतून बाईकचा प्रवास सुरू होईल. मग मनाली ते लेह, कारगील प्रवास पूर्ण होईल. या संपूर्ण ट्रिपमध्ये ट्रान्सपोर्ट, हॉटेल, जेवण, गाईड आणि इंश्युरन्सची व्यवस्था आयआरसीटीकडून करण्यात येईल.

किती खर्च लागेल?

एका व्यक्तीसाठी या पूर्ण पॅकेजची किंमत 46,890 रुपये आहे. दोघांसाठी बुकिंग केल्यास एका व्यक्तीला 35,750 रुपये लागतील. तिघांसाठी बुकिंग केल्यास प्रति व्यक्ती 35,490 रुपये द्यावे लागतील. यात 12 रात्री आणि 13 दिवस प्रवास असेल.

बुकिंग कसं करणार?

या पॅकेजचं बुकिंग करण्यासाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बुकिंग करावं लागेल.

हेही वाचा :

रेल्वे स्टेशनवर स्क्रीनिंगवेळी शरीराचे तापमान जास्त असल्यास पाठवणार घरी; रिझर्व्हेशनचे पैसे परत मिळणार

IRCTC च्या वेबसाईटवर ‘ही’ ट्रिक वापरा, तत्काळ तिकीट नक्की मिळणार !

IRCTC Push Notification | ट्रेन तिकीटच्या बुकिंगसाठी भटकणं बंद, आता मोबाईलवर मिळणार सर्व माहिती

व्हिडीओ पाहा :

IRCTC offer package for Manali Leh Srinagar bike tour know how to book

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें