LIC IPO : तरच मिळेल तुम्हाला ‘एलआयसी’ आयपीओ; कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ‘ही’ डेडलाईन !

तुमच्याकडे एलआयसीची एक किंवा दोन पॉलिसी असल्यास आणि तुम्हाला पॉलिसी कोट्यातून आयपीओ खरेदीसाठी पॅन (PAN Update) अपडेट करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच डि-मॅट खातं (D-MAT ACCOUNT) असणं बंधनकारक आहे.

LIC IPO : तरच मिळेल तुम्हाला ‘एलआयसी’ आयपीओ; कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ‘ही’ डेडलाईन !
LIC IPO
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 8:11 PM

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी (Insurance Company) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) आयपीओची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. एलआयसीच्या बहुप्रतीक्षित आयपीओत पॉलिसीधारकांना विशेष सवलत दिली जाणार आहे. आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना 5 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. इश्य प्राईसवर एलआयसी मार्केट कॅपमध्ये देशातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये सहज समाविष्ट होऊ शकेल. लिस्टिंगनंतर एलआयसीची कामगिरी दमदार राहिली तर विमा कंपनीची दादागिरी आयपीओ आणि शेअर बाजारात ही चालेल. कंपनी आयआयएल आणि टीसीएलही मागे टाकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एलआयसी पॉलिसीधारकांना वेळेपूर्वीच काही कागदपत्रांची पूर्तता करणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. तुमच्याकडे एलआयसीची एक किंवा दोन पॉलिसी असल्यास आणि तुम्हाला पॉलिसी कोट्यातून आयपीओ खरेदीसाठी पॅन (PAN Update) अपडेट करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच डि-मॅट खातं (D-MAT ACCOUNT) असणं बंधनकारक आहे. दोन्ही अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्ती एलआयसी शेअरची खरेदी निश्चितच करू शकतील. एलआयसीच्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीअखेर पॅन अपडेट करण्याची मुदत असेल.

तुम्ही PAN कसं अपडेट कराल?

1. https://licindia.in किंवा https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp दोन्हींच्या सहाय्याने एलआयसीच्या वेबसाईटवर जा. 2. होम पेजवर ऑनलाईन पॅन नोंदणीचा पर्याय निवडा आणि त्यानंतर (पुढे सुरू ठेवा) Proceed वर क्लिक करा. 3. तुमची वैयक्तिक माहिती जसे की पॅन, पॉलिसी नंबर, मोबाईल नंबर, इमेल आदी महिती द्या. योग्य ठिकाणी योग्य माहिती भरा. चुका टाळा. 4. तुम्हाला बॉक्स दिसून येईल. त्यामध्ये कॅप्चा कोड भरा 5. कॅप्चा कोड भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. 6. पोर्टलवर ओटीपी एन्टर करा आणि शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा.

केंद्राचं ‘आयपीओ’साठी प्रयत्न :

केंद्र सरकारने सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या आयपीओसाठी मोठी पावलं उचलली आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत 10 मर्चंट बँकरची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये गोल्डमॅन सॅक्स, सिटी ग्रूप आणि नोमुरा यांचा समावेश आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून सिरिल अमरचंद मंगलदास यांची नियुक्ती केली होती.

आयपीओ म्हणजे काय?

आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक आॕफर. मार्केटमध्ये पैसे गोळा/उभारण्याचा मार्ग आहे. कंपनीला पैशाची आवश्यकता असते. तेव्हा शेअर बाजारपेठेत लिस्ट केले जातात. आयपीओ द्वारे मिळणारी रक्कम कंपनी स्वतःच्या निर्णयानुसार खर्च करतात. या रकमेचा वापर कंपनी लोन भरण्यासाठी किंवा कंपनीच्या फायद्यासाठी वापरली जाऊ शकते. स्टॉक एक्स्चेंज वर शेअर्स लिस्टिंगमुळे कंपनीला आपल्या शेअरला योग्य किंमत मिळविण्यासाठी मदत होते.

इतर बातम्या :

Assembly Election 2022 : दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं; गोव्यात विक्रमी मतदान, उत्तर प्रदेश, उत्तराखंडची स्थिती काय?

‘साडे तीन लोकांना अटक करा किंवा साडे तिनशे, पण आधी आरोपांची उत्तरं द्या’, किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरे, राऊतांना खोचक टोला

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.