एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे भरा अन् महिन्याला मिळवा 12 हजारांची पेन्शन

LIC scheme | एलआयसी सरल पेन्शन स्कीमचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लाइफ अॅन्युइटी विथ 100% रिटर्न ऑफ परचेस प्राईस आणि दुसरी पेन्शन योजना म्हणजे संयुक्त जीवन. सिंगल लाईफ पॉलिसी ही एकाच व्यक्तीच्या नावावर असेल. त्यामुळे पेन्शनधारक जिवंत असेल तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील.

एलआयसीच्या 'या' स्कीममध्ये एकदाच पैसे भरा अन् महिन्याला मिळवा 12 हजारांची पेन्शन
एलआयसी

मुंबई: जर तुम्ही भविष्याची तरतूद म्हणून एखाद्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. या पॉलिसीचे नाव सरल पेन्शन योजना आहे. एलआयसी सरल पेन्शन योजना हा एक सिंगल प्रीमियम प्लॅन आहे. 1 जुलैपासून ही योजना सुरु झाली आहे.

सरल पेन्शन योजनेत कशी गुंतवणूक कराल?

एलआयसी सरल पेन्शन स्कीमचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लाइफ अॅन्युइटी विथ 100% रिटर्न ऑफ परचेस प्राईस आणि दुसरी पेन्शन योजना म्हणजे संयुक्त जीवन. सिंगल लाईफ पॉलिसी ही एकाच व्यक्तीच्या नावावर असेल. त्यामुळे पेन्शनधारक जिवंत असेल तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. तर संयुक्त जीवन योजनेत पती-पत्नी अशा दोघांना कव्हर केले जाईल. या दोघांपैकी कोणीही शेवटपर्यंत जिवंत राहील त्याला पेन्शन मिळत राहील. दोघांचाही मृत्यू झाला तर वारसदाराला बेस प्राईसचे पैसे मिळतील.

सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये काय?

* विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याचे पेन्शन सुरू होईल.
* आता हे तुमच्यावर अवलंबून असेल की तुम्हाला दरमहा किंवा तिमाहीत पेन्शन हवी आहे, अर्धवार्षिक किंवा वार्षिक. तुम्हाला हा पर्याय स्वतः निवडावा लागेल.
* ही पेन्शन योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे घेता येते.
* या योजनेमध्ये किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
* ही योजना 40 ते 80 वर्षांच्या लोकांसाठी आहे.
* या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर कधीही कर्ज मिळेल.

पोस्टाच्या योजनेत महिन्याला 2850 रुपये जमा करा आणि मिळवा 14 लाख रुपये

पोस्ट ऑफिस योजना सुरक्षेच्या दृष्टीने चांगली मानली जाते. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी, ग्राम सुमंगल पोस्ट ऑफिस ग्राम सुमंगल खूप उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही दरमहा 2850 रुपये गुंतवले तर तुम्हाला 14 लाख रुपये मिळू शकतात. ग्रामीण टपाल कार्यालयाच्या वतीने ग्रामीण लोकसंख्येचा विमा काढण्याच्या उद्देशाने 1995 मध्ये ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) सुरू करण्यात आला.

RPLI लोकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन सहा प्रकारच्या विमा पॉलिसी देते. एवढेच नाही तर, या योजनेमध्ये, पॉलिसीधारकाच्या अस्तित्वावर म्हणजेच पैसे गुंतवलेल्या रकमेच्या परताव्यावर पैसे परत करण्याचा लाभ देखील उपलब्ध आहे. ग्राम सुमंगल योजनेमध्ये लाभार्थ्याला मॅच्युरिटी वर बोनस देखील मिळतो. ही योजना दोन कालावधीसाठी उपलब्ध आहे. पहिली 15 वर्षे आणि दुसरी 20 वर्षे. या योजनेसाठी किमान वय 19 वर्षे आणि कमाल वय 45 वर्षे आहे. कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

संबंधित बातम्या:

इंधन दरवाढीचा भडका उडणार, दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा कधी गाठणार, तज्ज्ञ काय म्हणतात, कोणत्या शेअर्सच्या किंमती वाढणार?

स्वस्त हॉटेल्स पुरवणारे Oyo Hotels आता देणार गुंतवणुकीची संधी, 1 अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI