स्वस्त हॉटेल्स पुरवणारे Oyo Hotels आता देणार गुंतवणुकीची संधी, 1 अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत

नियामक सूचनेनुसार, गेल्या आठवड्यात OYO ची मूळ कंपनी Oravel Stage च्या भागधारकांनी कंपनीला खासगी मर्यादित कंपनीतून पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिली.

स्वस्त हॉटेल्स पुरवणारे Oyo Hotels आता देणार गुंतवणुकीची संधी, 1 अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत

नवी दिल्लीः OYO ही स्वस्त हॉटेल सेवा देणारी कंपनी लवकरच IPO घेऊन येणार आहे. असे मानले जाते की, कंपनी 1 अब्ज डॉलर्सच्या आयपीओसंदर्भात पुढील आठवड्यात सेबीला कागदपत्रे सादर करू शकते. OYO ने IPO व्यवस्थापित करण्यासाठी जेपी मॉर्गन, सिटी आणि कोटक महिंद्रा कॅपिटल सारख्या गुंतवणूक बँकांची नियुक्ती केलीय.

नियामक सूचनेनुसार, गेल्या आठवड्यात OYO ची मूळ कंपनी Oravel Stage च्या भागधारकांनी कंपनीला खासगी मर्यादित कंपनीतून पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिली. यापूर्वी ओरावेल स्टेजच्या बोर्डाने कंपनीचे अधिकृत भागभांडवल 1.17 कोटी रुपयांवरून 901 कोटी रुपये करण्यास मंजुरी दिली होती.

झोमॅटोच्या आयपीओला जोरदार प्रतिसाद

जुलैमध्ये फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने आयपीओ आणला होता, ज्याला गुंतवणूकदारांचे खूप प्रेम मिळाले. येत्या काळात पेटीएम आणि नायका सारख्या कंपन्याही आयपीओ आणत आहेत. याशिवाय ओला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. एकंदरीत सर्व यशस्वी स्टार्टअप सध्या बाजारातील आयपीओच्या आगमनाकडे लक्ष लावून बसलेत.

सॉफ्ट बँकेकडे 46% हिस्सा

OYO हॉटेल्सला सॉफ्टबँकचा पाठिंबा आहे आणि त्यात 46 टक्के हिस्सा आहे. कोरोना महामारीमुळे हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसला. ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी जुलैमध्ये सांगितले की दुसऱ्या लाटेनंतर व्यवसाय पुन्हा एकदा तेजीत येऊ लागला आहे.

गुंतवणूक बँकर्स म्हणून नेमणूक करण्यात आली

गेल्या महिन्यात ओयोला मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनकडून $ 5 दशलक्ष म्हणजेच 350 दशलक्ष निधी मिळाला. या आयपीओसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन आणि सिटी यांना बँकर्स म्हणून नियुक्त केले आहे. असे मानले जाते की ओयोचे मूल्यांकन $ 14-16 अब्ज असेल.

संबंधित बातम्या

PF शी संबंधित ‘या’ 6 मोठ्या सुविधा उमंग अॅपवर मिळणार, सर्व कामं घर बसल्या होणार

मोदी सरकारचा चीनवर प्रहार, चिनी कंपन्यांना LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्यास बंदी

Oyo Hotels, which offers affordable hotels, will now offer investment opportunities, preparing to launch a 1 billion IPO

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI