तुमचे पॅन आधारला लिंक आहे का? नसेल तर आजच लिंक करा, 31 मार्चनंतर होऊ शकते मोठे नुकसान

तुमचे पॅन आधारला लिंक आहे का? नसेल तर आजच लिंक करा, 31 मार्चनंतर होऊ शकते मोठे नुकसान

तुम्ही अजूनही जर आधार कार्डला पॅन (PAN) कार्ड लिंक केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 31 मार्चच्या आत तुमचे पॅन कार्ड आधारला लिंक (PAN-Aadhaar link) करू घ्या. अन्यथा 31 मार्चनंतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Mar 16, 2022 | 7:48 AM

तुम्ही अजूनही जर आधार कार्डला पॅन (PAN) कार्ड लिंक केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 31 मार्चच्या आत तुमचे पॅन कार्ड आधारला लिंक (PAN-Aadhaar link) करू घ्या. 31 मार्च ही आधार – पॅन लिंकिंगसाठी अंतिम तारीख आहे. जर तुम्ही 31 मार्चनंतर देखील आधारला पॅन लिंक न केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. तुम्हाला टीडीएस (TDS) तर भरावा लागेलच सोबतच तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते. बँकिंग सेवांचा लाभ देखील घेण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपले पॅन आधारला लिंक आहे का? ते आधी चेक करून घ्या, नसेल लिंक केले तर आजच आपले पॅन आधारला लिंक करा. आर्थिक गौरव्यवहारांना आळा घालण्यासाठी पॅन आणि आधार लिंकिंग सक्तीचे करण्यात आले आहे. यापूर्वी कोरोनामुळे आधार आणि पॅन लिंकिंगसाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 मार्चपर्यंत आधारला-पॅन लिंक करता येणार आहे. 31 मार्चपर्यंत पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असून, आधार- पॅन लिंक न झाल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

आधार लिंक नसेल तर काय होऊ शकते?

तुम्ही जर 31 मार्चपर्यंत आधार आणि पॅन लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते. पॅन बंद झाल्यास आयकर विभागाकडून असे माणण्यात येईल की तुम्ही तुमचे पॅन कार्ड जमा केले नाही. अशा स्थितीमध्ये तुम्हाला दंड म्हणून एक मोठी रक्कम भराली लागू शकते. सोबतच तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते. पॅन कार्ड बंद असल्याने तुम्हाला बँकेंशी संबंधित जसे की, नवीन खाते ओपन करणे, कॅश काढणे, व इतर पैशांच्या व्यवहारांसाठी अडचणी येऊ शकतात.

दहा हजारांचा दंड

इनकम टॅक्स कलम 272 बी नुसार, तुम्ही जर आयकर विभागाकडे तुमचे पॅन कार्ड जमा नाही केले तर तुम्हाला दहा हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. कर भरताना तुम्ही जर पॅन कार्ड सबमीट केले नाही तर तुम्हाला प्रत्येक वेळी दंड होतो. तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅनला लिंक केलेले नसेल तर ते 31 मार्चनंतर आपोआप बंद होईल. पॅन बंद झाल्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आजच तुमचे पॅन कार्ड आधारला लिंक करून घ्या.

संबंधित बातम्या

मिरची आता खिशालाही झोंबणार! हिरव्या मिरचीचा भाव तिप्पट वाढला, किरकोळ बाजारात किती दर?

Vehicle Scrappage Policy: वेहिकल स्क्रपिंग प्रोसेस पूर्णतः होईल डिजिटल, सरकार ने जाहीर केली नवीन नियमावली

ग्राहकाभिमुख सेवांनी ग्राहकांचे ‘उज्जीवन’ , उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा नवउपक्रम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें